ग्रहणानिमित्त दगडूशेठ गणपती मंदिरात मंत्रपठण

पुणे: येथील दगडूशेठ गणपती मंदिरात खग्रास सूर्यग्रहण असल्याने धार्मिक अनुष्ठान सकाळपासून चालू आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ‘ शासनाच्या सूचनेनुसार गणपती मंदिर सध्या दर्शनासाठी बंद आहे.पूजाअर्चा आदी नित्योपचार चालू असतात. खग्रास सूर्यग्रहण असल्याने प्रवेश दारापाशी पडदा लावून श्रींच्या मूर्तीचे दर्शन बंद केले असून पूजेची मूर्ती सोवळ्याने झाकण्यात आली आहे. मोजक्या ब्रह्मवृंदांच्या उपस्थितीत मंदिरात ब्रह्मणस्पति सूक्त, अथर्वशीर्ष पठण करण्यात येत आहे. ग्रहणाच्या मोक्षकाळानंतर अभिषेक केला जाईल आणि मग नित्योपचार होतील, अशी माहिती श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी यांनी सांगितली.