‘दगडूशेठ गणपती’ चरणी 151 किलोचा महामोदक अर्पण !

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन टीम – पुण्यातील नवसाला पावणार गणपती आणि ज्याची किर्ती संपूर्ण जगात पोहोचली आहे असा श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे ढोल ताशांच्या गजरात आगमन झाले आहे. आज सकाळी एका भाविकाने श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या चरणी १५१ किलोचा मोदक अर्पण केला आहे. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती समोर मंगळवारी सकाळी तब्बल २५ हजार महिलांनी एकत्र येत अथर्वशीर्ष पठणातून स्त्री शक्तीचा जागर केला आणि त्यानंतर बाप्पाच्या चरणी एका भाविकांने १५१ किलोचा मोदक अर्पण केला आहे.

हा मोदक पाहण्यासाठी भाविकांनी एकच गर्दी केल्याचे पाहण्यास मिळाले आहे. गणरायाच्या नामाचा जयघोष करत ॠषीपंचमीनिमित्त आयोजित सोहळ्यात उत्साहपूर्ण वातावरणामध्ये या महिलांचा आनंदही पाहण्याजोगा होता. हा मोदक तब्बल ८ तासांच्या मेहनतीनंतर १५ कारागिरांच्या मदतीने तयार करण्यात आला. हा मोदक वडगाव मावळ येथील जिल्हा परिषद सदस्य बाबुराव वायकर यांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या चरणी अर्पण केला. काका हलवाईचे महेंद्र गाडवे व युवराज गाडवे यांनी हा महामोदक तयार केला आहे. काजू, बदाम, पिस्ता, बेदाणे यांसह चांदीचे अर्क या मोदकाला केले आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

तुळशीची पाने किडनी स्टोनवर गुणकारी, जाणून घ्या असेच ९ फायदे

शरीराला थंडावा देतात ‘हे’ पदार्थ, अवश्य करा यांचे सेवन, जाणून घ्या

देशातील युवा वर्ग होत आहे ह्रदयविकाराने त्रस्त, अशी घ्या काळजी

नैसर्गिक सौंदर्यासाठी ‘हे’ फेसपॅक वापरा, निस्तेज, कोरडा चेहरा होईल तजेलदार

काकडी खाल्ल्याने होतील ‘हे’ चमत्कारिक फायदे, तुम्हाला माहीत नसावेत

कोणत्या फळात किती पाणी, जाणून घ्‍या ; वजन कमी करण्यासही फायदेशीर

२ रुपयांच्‍या तुरटीने संधीवात होतो दूर, जाणून घ्‍या इतरही अमेझिंग फायदे 

‘ही’ ५ फळे वेगाने करतात ‘फॅट बर्न’, आजच करा ‘डाएट’मध्‍ये समावेश

रोज चिमुटभर मिरपुड खाल्ल्याने कमी होईल वजन, होतील ‘हे’ फायदे

‘या’ ७ लोकांनी अवश्‍य प्‍यावा ‘पायनॅप्‍पल ज्‍यूस’, जाणून घ्‍या काय आहे कारण  

लग्नापूर्वी वर-वधूला का लावली जाते हळद ? जाणून घ्या

मानवाने प्राण्यांकडून शिकाव्यात अशा ‘या’ गोष्टी, राहाल नेहमी निरोगी, सशक्त

धान ! ‘या’ व्हिटॅमिनच्‍या कमतरतेमुळे होऊ शकतो मृत्‍यू, जाणून घ्या १२ संकेत