दगडुशेठ गणपती मंदिर 30 जूनपर्यंत बंदच राहणार

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन- सध्या महाराष्ट्रामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. पुण्यामध्ये देखील रुग्णसंख्येत भर पडत आहे. त्यामुळे राज्य शासनाने सार्वजनिक ठिकाणे व मंदिरे बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर शासन आदेशानुसार ३० जून पर्यंत बंद राहणार आहे.

केंद्र सरकारने दिलेल्या नियमावलीनुसार देशातील मंदिरे, रेस्टॉरंट ८ जूनपासून खुली करण्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे येत्या सोमवारी ८ जून रोजी संकष्टी चतुर्थी असल्याने मंदिर खुले होणार असा भाविकांचा समज होऊ नये, यासाठी दगडूशेठ मंदिर बंदच असून गर्दी करु नये, असे आवाहन करण्यात येत असल्याचे ट्रस्टतर्फे कळविण्यात आले आहे.

केंद्र सरकारने जरी सार्वजनिक ठिकाणे व मंदिरे ८ जूनपासून खुली करण्यास परवानगी दिली असली तर महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार राज्यातील मंदिरे ३० जूनपर्यंत बंदच राहणार आहेत. त्यानुसार श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टने देखील ३० जूनपर्यंत मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like