Video : ‘या’ अभिनेत्रीचा ‘मंकी डान्स’ सोशलवर तुफान व्हायरल !

बॉलिवूड ॲक्ट्रेस अदा शर्मा आपल्या लुक आणि फॅशन सेंससाठी ओळखली जाते. इव्हेंट असो किंवा कॅज्युअल आऊटिंग अदाचा लुक पाहण्यासारखा असतो. आपल्या लुकमुळे सोशलवरही ती चर्चेत असते. अदा नेहमीच आपल्या हॉट अँड बोल्ड फोटोंमुळे चर्चेत असते. अदाचा आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे ज्यामुळं तिनं साऱ्यांचं लक्ष वेधलं आहे.

अदानं तिच्या इंस्टावरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात ती माकडाचा मुखवटा घालून डान्स करताना दिसत आहे. अदाचा हा व्हिडीओ लंडनमधील आहे. कुणीतरी तिला हा मुखवटा भेट म्हणून दिल्याचं तिनं सांगितलं आहे. व्हिडीओ शेअर करताना तिनं खास कॅप्शनही दिलं आहे.

अदाचा हा व्हिडीओ सध्या सोशलवर तुफान व्हायरल झाला आहे. अद्याप लाखो लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. अनेकांनी यावर कमेंट करत प्रतिक्रिया देखील दिल्या आहे.

अदाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर लवकरच ती आगामी सिनेमा मॅन टू मॅन मध्ये काम करतना दिसणार आहे. अदा काही दिवसांपूर्वी आलेल्या कमांडो 3 सिनेमात दिसली होती. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर हिट ठरला. 2008 साली आलेल्या 1920 या सिनेमातून अदानं आपल्या करिअरला सुरुवात केली होती. यासाठी तिला बेस्ट फीमेल डेब्यू अवॉर्ड मिळाला होता. अदानं कमांडो 2, हंसी तो फंसी या सिनेमातही काम केलं आहे.