दहीहंडी उत्सव : उत्सव की राजकीय पोळी ?

पोलीसनामा ऑनलाईन

ऋषिकेश करभाजन

जन्माष्टमी म्हणजे गोकुळ अष्टमी, कृष्ण जन्माचा दिवस. श्रावण महिन्यात वद्य अष्टमी या तिथीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर मथुरेत कंसाच्या बंदिशाळेत श्रीकृष्णाचा जन्म झाला, म्हणून त्या दिवशी आनंदोत्सव साजरा करण्याची प्रथा आहे.हा उत्सव भारतात सर्वत्र होतो. गोकुळ, मथुरा, वृंदावन, द्वारका, पुरी या ठिकाणी तो मोठ्या प्रमाणावर साजरा होतो.ओरिसामध्ये दहीहंडी जत्रा किंवा दहीभंगा जत्रा या दिवशी साजरी केली जाते. गोकुळ अष्टमीच्या दिवशी उपवास करण्याची प्रथा आहे. गुजराथमध्ये ‘सातम’ म्हणजे सप्तमीच्या दिवशी पैसे लावून किंवा तसेच दिवसभर पत्ते खेळतात. रात्री बारा वाजता पत्ते बंद करून कृष्णजन्माचा उत्सव सुरू करतात.

[amazon_link asins=’B00FT694AC,8193305205′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’2c6c62a5-affc-11e8-a2e9-9f375dc04aca’]

मध्य प्रदेशात आणि उत्तरी भारताच्या बऱ्याचशा भागात पौर्णिमान्त महिना असलेले पंचांग वापरात असल्याने या दिवशी त्यांची भाद्रपद कृष्ण अष्टमी येते. या दिवशी कित्येकांच्या घरी गोकुळ-वृंदावनाचा देखावा तयार करून जन्मोत्सव साजरा करतात. वैष्णव लोक तर हा दिवस विशेष भक्तीने पाळतात.वृंदावन येथे या दिवशी दोपोत्सव असतो.याच दिवशी कृष्णाच्या आयुष्यातील महत्वाची संकल्पना रासलीला हिचे सादरीकरण केले जाते.

मात्र आता दहीहंडी हा उत्सव, उत्सव म्हणून नाही तर राजकारणी आपल्या पोळ्या भाजण्यासाठी करत आहेत का ? असा प्रश्न निर्माण झाला आहे. आपण पहिल्या प्रमाणे सध्याच्या स्थितीत दहीहंडी उत्सवात विविध आकर्षणे तसेच मराठी चित्रपट श्रुष्टि आणि हिंदी चित्रपट श्रुष्टितले कलाकार आणून नाचवणे. हे योग्य की आयोग्य ? एकेकाळी या उत्सवाची आतुरतेने वाट पहाणारी जनता आता मात्र या उत्सवाच्या दिवशी कोणता कलाकार येणार आणि काय सादर करणार याची वाट पाहतो.

रायगड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात स्फोटकांचा साठा जप्त

उत्सव की विकृती ?

पूर्वीच्या काळात हा उत्सव गावामध्ये , तसेच शहरांमध्ये एका ठिकाणी आणि मोठ्या प्रमाणात साजरा केल्या जायचा, मात्र आता वेगवेगळे मित्र मंडळ , तसेच विविध पक्षातील नेते आपापल्या विभागांमध्ये हा उत्सव साजरा करत आहेत. यामध्ये राजकीय उद्दिष्टये की उत्सवाचा आनंद हेच कळायला मार्ग उरला नाहीये.

पुणे येथे दहीहंडी मंडळाकडून मोठ-मोठे शुभेच्छा आणि आयोजीत कार्यक्रमाचे फ्लेक्स लावले जाता होते. त्यातून दोन गटात किरकोळ वादही झाले होते. मात्र, शनिवारी मध्यरात्री सिंहगड भागात याच वादातून ५ जणांनी अक्षय गडशी या तरुणावर तलवारीने वार केला याच झालेल्या वादात तरुणाचा खून झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. या घटनेवरून दहीहंडी सारखा उत्सव म्हणजे केवळ उत्सव नाही तर त्याला विकृतीचे स्वरूप आले आहे का ? असे म्हणावे लागेल.

ठाण्यात दहिहंडी उत्सवात मुख्यमंत्र्यांसमोरच नियमांचे उल्लंघन

पूर्वीच्या काळी थरांचे व धोक्याचे प्रमाण पहाता दहीहंडी उत्सवाला काही प्रमाणात बंधनही लावण्यात आली होती. मात्र सध्याच्या काळात या सर्व बंधनांचे उल्लंघन केल्या जात आहे. जसेकी मुंबई मध्ये दहीहंडी उत्सव साजरा करते वेळी ३६ जण जखमी झाल्याचे वृत्त समोर आले आहे. एका पेक्षा एका चढाओढीने दहीहंडीचे पारितोषिक आणि थर चढवणे अश्या विविध गोष्टी समोर येत आहेत. याकडे पहाता हा उत्सव म्हणून नाही तर एक पैशे कमावण्याचे साधन झाले आहे. असे दिसून येते. यामुळे दहीहंडी हा उत्सव उत्सव नाही तर राजकीय तवा ? आहे का असा प्रश्नही निर्माण होतो.

पुणे : दहीहंडी फ्लेक्स लावण्यावरून तरुणाचा खून

[amazon_link asins=’B01FAFHZES,B01IFR3DVW’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’517f6f1c-affe-11e8-a9c3-4b87fe6d5c0a’]