Dahi Handi | राज्यात जन्माष्टमीला दहीहंडीची परवानगी नाही, कडक नियमांच्या आणि निर्बंधांच्या कक्षेत साजरा केला जाईल गणेशोत्सव; जाणून घ्या

मुंबई : Dahi Handi | यंदा महाराष्ट्रात (Maharashtra) जन्माष्टमीनिमित्त दहीहंडीचा वार्षिक उत्सव होणार नाही (Dahi handi not allowed on janmashtami) कारण, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांनी राज्यातील मंडळांना आवाहन (appealed) केले आहे की, मानवतेच्या आधारावर त्यांनी लोकांच्या आरोग्याला प्राथमिकता द्यावी आणि आणखी काही काळ सणांच्या कार्यक्रमांपासून दूरच रहावे.

ठाकरे यांनी सोमवारी मंडळाच्या पदाधिकार्‍यांसोबतच्या बैठकीत ( meeting with Govinda Mandals and Govinda Pathak) म्हटले की, कोरोना महामारीमुळे लोक अजूनही उपजिविकेसाठी संघर्ष करत आहेत. महाराष्ट्रातील मंडळे आणि गोविंदा पथकांनी राज्य सरकारला विनंती केली होती की, छोट्या प्रमाणात तरी दहीहंडी उत्सव साजरा करण्याची परवानगी द्यावी, कारण सराव सत्र अगोदरपासूनच सुरू झाले आहे.

दोन्ही लसी घेतलेले लोकच सहभागी होतील

मागील आठवड्यात राज्याचे मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासोबतच्या बैठकीत दहिहंडी समन्वयक समितीने म्हटले होते की, ते दहीहंडीसाठी तीन ते चारच थर लावतील आणि दोन्ही डोस घेतलेले लोकच कार्यक्रमात सहभागी होतील.

मिड-डे वृत्तपत्राने काही सदस्यांच्या संदर्भाने लिहिले आहे की, जर गणेशोत्वस छोट्या प्रमाणात साजरा केला जाऊ शकतो तर दहीहंडी उत्सवासाठी सरकारने परवानगी दिली पाहिजे.

सक्त प्रतिबंधामध्ये साजरा केला जाईल गणेशोत्सव (strict restrictions for Ganeshotsav)

भाजपा आमदार राम कदम यांनी म्हटले आहे की, नेहमी प्रमाणे यावर्षी दहीहंडी कार्यक्रम आयोजित
करू, परंतु उत्सवात किती लोक सहभागी होतील, हे आम्ही सरकारकडून देण्यात आलेल्या
सवलतीवरच ठरवू. कोरोना महामारीमुळे महाराष्ट्रात यावर्षी गणेशोत्सव सक्त प्रतिबंधाच्या कक्षेत
साजरा केला जाणार आहे. यासाठी राज्याने मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत.

हे देखील वाचा

PM Kisan | पीएम किसानच्या नवीन यादीतून कोणा-कोणाचे नाव वगळले?, ‘या’ पद्धतीने तपासा तुमच्या संपूर्ण गावाची यादी; जाणून घ्या

Narayan Rane | केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर वादग्रस्त विधानामुळे पुण्यासह नाशिक, महाड मध्ये गुन्हे दाखल, अटक होणार?; नाशिक, पुण्याहून पोलीस पथक चिपळूणला रवाना

Transfer | पुणे-पिंपरीतील अप्पर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, डॉ. संजय शिंदे, रामनाथ पोकळे यांच्या बदल्या; IPS सुधीर हिरेमठ यांना पदोन्नती तर पुण्यात ‘या’ अधिकाऱ्याची नियुक्ती

 

ट्विटर ला देखील फॉलो करा

 

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : dahi handi not allowed on janmashtami in maharashtra

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update