दोन दिवसांनी राम कदमांना उपरती

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन 

लग्नासाठी मुली पळवून आणण्याची भाषा करणाऱ्या भाजपा आमदार राम कदम यांच्यावर नेटकऱ्यांनी भरपूर टिका केली असली तरी गेले दोन दिवस ते त्याचे समर्थन करीत होते. पण, त्याला आता राजकीय वळण मिळत असल्याचे दिसल्याने शेवटी त्यांनी त्यांच्या विधानाबद्दल खेद व्यक्त केला आहे. कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नव्हता. दुखावल्या असतील तर मी खेद करतो, असे राम कदम यांनी म्हटले आहे. माझे विधान अर्धवट पसरवून संभ्रम निर्माण करण्यात आला, असे म्हणत त्यांनी या प्रकरणाचे खापर विरोधकांवर फोडले आहे. दरम्यान मनसेने राम नव्हे रावण अशी पोस्टर ठिकठिकाणी उभारली आहेत.

[amazon_link asins=’B008QS9J6Y,B01LY2TN7G’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’189de3ff-b0c0-11e8-af0c-035b0ac07bcd’]

घाटकोपर येथे सोमवारी दहिहंडी उत्सवावेळी उपस्थित तरुणांशी संवाद साधताना भाजपाचे आमदार राम कदम यांनी वादग्रस्त विधान केलं होते. या विधानामुळे त्यांच्यावर जोरदार टीका झाली. विरोधकांसह सर्वसामान्यांनीदेखील राम कदम यांच्यावर तोंडसुख घेतलं. तरीही आपण आपल्या विधानावर ठाम असल्याचं कदम यांनी मंगळवारी दुपारी म्हटले होते. मात्र रात्री राम कदम यांनी ट्विटरवरुन त्यांच्या विधानाबद्दल खेद व्यक्त केला. ‘कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नव्हता. दुखावल्या असतील तर मी खेद व्यक्त करतो. विरोधकांनी दुसऱ्या दिवशी ५४ सेकंदांचे अर्धवट विधान पसरवून संभ्रम निर्माण केला. आदल्या दिवशी दुपारी पत्रकार उपस्थित होते. मात्र त्यांनी आक्षेप घेतला नाही. कारण त्यांनी संपूर्ण संभाषण ऐकलं होते, असं राम कदम यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

आमदार राम कदमांच्या रुपाने भाजपचा ‘रावणी’ चेहरा समोर आला : नवाब मलिक

कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतु नव्हता, दुखावल्या असतील तर मी खेद व्यक्त करतो. अर्धवट ५४ सेकंदाचे विधान काही विरोधकांनी पसरवून सम्भ्रम निर्माण केला दुसऱ्या दिवशी ! आदल्या दिवशी दुपारी मीडिया पत्रकार उपस्थित होते. त्यानी आक्षेप घेतला नाही कारण त्यांनी संपूर्ण संभाषण ऐकले होते.

काय म्हणाले होते राम कदम?

भाजपा आमदार राम कदम यांनी काल घाटकोपरमध्ये दहिहंडी उत्सवाचं आयोजन केलं होतं. यावेळी उपस्थित तरुणांशी बोलताना राम कदम यांनी वादग्रस्त विधान केलं. ‘एखाद्या मुलानं एखाद्या मुलीला प्रपोज केलं असेल, मात्र तिचा नकार असेल, तर त्यानं त्याच्या आई-वडिलांना घेऊन माझ्याकडे यावं. त्या मुलाच्या पालकांना मुलगी पसंत असल्यास त्या मुलीला पळवून आणण्यात मी मदत करेन. हे चुकीचं असेल तरी मी तुम्हाला १०० टक्के मदत करेन,’ असे राम कदम दहिहंडी उत्सवात बोलताना म्हणाले.

मनसेची पोस्टरबाजी

राम कदमांच्या या बेताल वक्तव्याविरोधात मनसेकडून पोस्टरबाजी करण्यात आली आहे. या पोस्टरमध्ये ‘राम नव्हे रावण’,असा राम कदम यांचा उल्लेख करण्यात आला आहे. घाटकोपर, भिवंडी आणि मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानाबाहेर हे पोस्टर्स लावण्यात आली होती. दरम्यान, मनसेकडून लावण्यात आलेले पोस्टर्स पोलिसांनी हटवले आहेत.

‘‘वाह रे भाजपा सरकार… वाह रे मुख्यमंत्री तुमचा आमदार… मतदारांनो आपल्या मुलींना सांभाळा स्वयंघोषित दयावान, डॅशिंग भाजप आमदार तुमच्या मुलींना पळवणार आहे. जर आमदार किंवा त्यांच्या बगलबच्च्यांनी असे केले तर पोलिसात तक्रार करा आणि आम्हाला कळवा. आम्ही तुमच्या सोबत आहोत, आपल्या मुलींचे रक्षण करण्यासाठी’’, असा मजकूर पोस्टरमध्ये मांडण्यात आला आहे.

विशेष म्हणजे ज्या दहीहंडी उत्सवात राम कदम यांनी बेताल विधान केले, त्या उत्सवास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही हजेरी लावली होती. कदम यांच्या या वक्तव्यावर विरोधकांनी टीकेची झोड उठवलेली असून सर्वसामान्यही सोशल मीडियावर संताप व्यक्त करत आहेत.