आज नागपंचमी, जाणून घेऊया कोणत्या राशींसाठी आहे शुभ दिवस

मेष: तब्येत बिघडू शकते. प्रवास करणे टाळावे. ‘धन’स्थिती चांगली राहील.

वृषभ: परिवारात आनंदाचे वातावरण राहील. नोकरीतील अडचणी दूर होतील. घरातील महिलांची कामात मदत होईल.

मिथुन: महत्वपूर्ण कामं बिघडू शकतात. कामाचा दबाव असेल. पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावावा.

कर्क: नोकरीमध्ये दुसऱ्या पदावर बदली होईल. नवीन जबाबदाऱ्या मिळतील. विवाहबद्दल शुभ बातमी कळेल.

सिंह: तब्येतीत सुधारणा होईल. घरात व्यस्त रहाल. पैशाची स्थिती चांगली राहील.

कन्या: विवाह आणि प्रेम प्रकारणाबद्दल शुभ बातमी मिळेल. नोकरीत बढती मिळू शकेल. पैशाचा लाभ होईल.

तूळ: दिवसभर कामात व्यस्त राहाल. नोकरीत तणाव जाणवेल. आज नवीन कामाची सुरुवात टाळावी.

वृश्चिक: आज मोठी संधी मिळेल. मानसन्मान मिळेल. खर्च वाढेल.

धनु: करियरमध्ये काही बदल होतील. ‘धन’स्थिती चांगली राहील. वाद सुटतील.

मकर: महत्वपूर्ण कामे पार पडतील. करियरमध्ये लाभ होतील. जेष्ठांचे सल्ले घेऊन काम करावे.

कुंभ: विनाकारण चिंता करू नये. करियरबद्दल गाफील राहू नये. चिल्लर दान करावी.

मीन: घरात शुभकार्य पार पडतील. नात्यातील वाद संपतील. चांगल्या लोकांच्या गाठीभेटी होतील.