‘इथं’ केवळ 50 रुपये जमा करून तुम्ही कमावू शकता 50 लाख, जाणून घ्या काय आहे स्कीम?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – तुम्ही सुद्धा बचतीची योजना आखत असाल तर तुम्ही कमी गुंतवणूक करून सुद्धा मोठी रक्कम कमावू शकता. यासाठी योग्य ठिकाणी गुंतवणूक प्लॅनिंग करता आले पाहिजे. जर योग्य प्रकारे गुंतवणूक करायची असेल तर रोज 50-50 रुपये जमा करून काही वर्षात 50 लाख रुपयांचा फंड तयार करू शकता. यासाठी म्युचुअल फंड चांगला पर्याय आहे. कमी गुंतवणूक करून चांगला नफा मिळवू शकता. जाणून घेवूयात कसे?

जाणून घ्या काय म्हणतात एक्सपर्ट?
प्रकरणावर जाणकार म्हणतात की, तुम्हाला तिथे गुंतवणुक केली पाहिजे, जिथे जास्त चांगला रिटर्न मिळेल. यासाठी म्युचुअल फंड एकदम योग्य आहे. एफडी किंवा पोस्ट ऑफिसच्या योजनांमध्ये गुंतवणुक केली तर 7-8 टक्केपेक्षा जास्त रिटर्न मिळणार नाही, परंतु म्यूचुअल फंडमध्ये तुम्हाला वार्षिक 12-15 टक्के रिटर्न सहज मिळू शकतो. यासाठी हाच तो पर्याय आहे जो तुम्हाला एक मोठा फंड तयार करण्यासाठी मदत करेल.

50 लाख रुपयांचा फंड तयार करण्यासाठी तुम्ही सीपद्वारे गुंतवणूक करू शकता. सीप म्हणजे सिस्टेमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. येथे तुम्ही दर महिन्याला थोडे-थोडे पैसे गुंतवता. फ्रेंकलिन टेम्पलटन ऑफ इंडिया वेबसाइटवर एक कॅल्क्युलेटर दिला आहे. त्यानुसार जर एखाद्या म्युचुअल फंड स्कीममध्ये दरमहिना केवळ 1000 रुपयांची गुंतवणूक केली 20 वर्षानंतर तुमच्याकडे 20 लाख रुचा फंड तयार होईल. येथे 12 टक्के अंदाजे रिटर्न मानला गेला आहे. जर कुणी दर महिना 500 रुपयांची गुंतवणूक केली तर 20 वर्षांमध्ये त्याच्याजवळ सुमारे 5 लाख रुपयांचा फंड तयार होईल. जर तुम्ही 30 वर्षापर्यंत दर महिना 500-500 रुपये जमा केले तर 17.5 लाख रुपयांपेक्षा जास्त फंड तयार होईल. प्रत्यक्षात जेवढ्या जास्त कालावधीसाठी तुम्ही गुंतवणूक कराल, तेवढा काळ तुम्हाला कम्पाऊंडिंगचा फायदा मिळेल.

जाणून घ्या कसे मिळतील 50 लाख
50 लाख रुपयांचा फंड तयार करायचा असेल तर दरमहिन्याला केवळ 1500 रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. 1500 रुपये प्रति महिन्याची गुंतवणूक म्हणजे रोज 50 रुपयांची बचत. कॅलक्युलेटरच्या हिशेबाने 12 टक्के अंदाजित रिटर्ननुसार जर तुम्ही दर महिना 1500-1500 रुपये जमा केले तर जमा केले तर 30 वर्षानंतर तुमच्याकडे जवळपास 53 लाख रुपयांचा फंड तयार होईल.