रोज दूध प्यायल्याने दूर होतील ‘हे’ गंभीर आजार, ‘हे’ 6 रिसर्चमधील महत्वाचे मुद्दे जाणून घ्या

दूध एक एक हेल्दी ड्रिंक म्हणून ओळखले जाते. यासाठी लहान मुलांना ते आवर्जून दिले जाते. विशेष म्हणजे दूध केवळ एक हेल्दी ड्रिंक नसून अनेक भयंकर आणि दिर्घकालीन आजारांवर उपचार सुद्धा आहे. नियमित दूध प्यायल्यास हे आजार दूर राहू शकतात. गरोदरपणात दूधाचे मध्यम सेवन आणि जन्माच्या वेळी वजन, लांबी आणि बोन मिनरल घटक यांच्यामध्ये एक सकारात्मक लिंक आहे. याशिवाय वयस्कर लोकांमध्ये दूध आणि डेअर उत्पादनांचे नियमित सेवन फ्राटिल्टी आणि सरकोपेनियाचा धोका कमी करते.

हे आहेत रिसर्चमधील महत्वाचे मुद्दे

1 अस्थमा, डायबिटीज, कॅन्सर आदी आजार दूर राहतील.

2 अ‍ॅडव्हान्सेस इन न्यूट्रिशन नावाच्या जर्नलमध्ये प्रकाशित अभ्यासात म्हटले आहे, रोज दूध प्यायल्याने कार्डियोवॅसकुलर, मेटाबोलिक सिंड्रोम, कोलन किंवा ब्लॅडर कॅन्सर, टाइप-2 डायबिटीज इत्यादी आजार दूर राहतात.

3 विकास, बोन मिनरल डेन्सिटी, मांसपेशी, प्रेग्नेंसी आणि ब्रेस्टफीडिंगवर परिणाम होतो.

4 यात पोषक तत्वांसह प्रोटीन, कॅल्शियम, मॅग्नीशियम, फॉस्फोरस, पोटेशियम, जस्त, सेलेनियम, व्हिटॅमिन ए, रायबोफ्लेविन, विटामिन बी 12 आणि पँटोथेनिक अ‍ॅसिडमुळे चांगले पोषण होते.

5 वर्टेब्रल फ्रॅक्चर रिस्कचा धोका कमी होतो.

6 लो फॅटची डेअरी उत्पादने मेटाबॉलिक सिंड्रोमचा धोका कमी करतात. हृदय रोग वाढण्याचा धोका कमी होतो.