नवीन वर्षात सर्वसामान्यांवर पडणार ‘महागाई’चा बोजा, दैनंदिन जीवनातील ‘या’ 9 वस्तू होणार ‘महाग’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच सर्व सामान्यांवर महागाईमुळे बोजा वाढणार आहे. कंपन्यांनी रोजच्या वापरातील अनेक वस्तूंचे दर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे लोकांच्या मासिक बजेटवर फरक पडू शकतो. पीठ, खाद्य तेल अशा गोष्टींमध्ये 12 ते 20 % इतपत वाढ झालेली आहे. टीव्ही आणि फ्रिजच्या किमतीमध्ये देखील पुढील महिन्यात मोठ्या प्रमाणावर वाढ होणार आहे.

या गोष्टींचे वाढले आहेत दर
एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार FMCG कंपनी नेस्ले (Nestle), पारले (Parle) आणि आईटीसी (ITC) चे म्हणणे आहे की, किमतींमध्ये वाढ करण्याऐवजी आम्ही आमच्या प्रॉडक्ट साईज कमी करतो यामुळे लोकांवर जास्त बोजा पडणार नाही. जर कंपनीने असे नाही केले तर कंपन्यांना किमतींमध्ये वाढ करावी लागेल. दुधाच्या किमतीमध्ये 35 % वाढ झाल्यानंतर पीठ 18 ते 20 %, साखर 14 % आणि खाद्य तेल 15 % नी महागले आहे.

जानेवारीपासून या गोष्टींची वाढणार किंमत
जानेवारीपासून बिस्किट, नूडल्स, स्नॅक्स नमकीन, फ्रोजन फूड, केक, साबण आणि रेडी टू इट मील्स मधील सर्व पदार्थांचे दर वाढवले जाऊ शकतात. कंपन्यांचे म्हणणे आहे की, कोर्पोरेट टॅक्स मध्ये कपात झाल्यामुळे लाभ मिळाला आहे त्यामुळे सध्या दरवाढ करण्यात आलेली नाही.

ग्लोबल स्तरावर टेलिव्हिजनच्या किमतीमध्ये 15 ते 17 % नी वाढ झालेली आहे. म्हणून जानेवारीत जेव्हा नवीन प्रोडक्शन मार्केटमध्ये येईल तेव्हा त्याच्या किमतीत वाढ झालेली असेल.

जानेवारीमध्ये 6 हजार रुपयांपर्यंत वाढू शकतात एसी आणि फ्रिजच्या किमती नवीन एनर्जी (New Energy Labelling Norms) नियम जानेवारीपासून लागू होणार आहेत. त्यानंतर 5 स्टार वाल्या फ्रिजच्या किमतीमध्ये 6 हजार रुपयांनी वाढ होणार आहे. CEAMA नुसार फ्रिज निर्मात्यांना फ्रिजमध्ये काही महत्वाचे बदल करावे लागणार आहेत म्हणून किमतीमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर वाढ केली जाऊ शकते.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/