पुणे पोलीस दलात ‘दक्ष’ रोबोट दाखल

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

पुण्यातील महत्त्वाच्या ठिकाणच्या संशयास्पद वस्तू, व्यक्तीची छाननी व ते निकामी करण्यासाठी पोलिसांना आता आपला जीव धोक्यात घालावा लागणार नाही. रोबोद्वारे (यंत्रमानव) हे काम केले जाणार असून येत्या सहा महिन्यात ‘दक्ष’ नावाचा यंत्रमानव पुणे पोलीस दलात रुजू होणार आहे. बॉम्ब शोध व नाशक पथकाच्या (बीडीडीएस) दिमतीला तो असणार आहे. बॉम्ब नाशक व शोधक पथकासाठी डीआरडीओकडून हा रोबोट घेण्यात येणार आहे. हा रोबोट पुर्णत: रिमोटवर चालणारा आहे. यासंदर्भात पोलीस आयुक्त डॉ.के.व्यंकटेशम यांनी नुकतेच ट्विट केले आहे.
[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’ec2979ab-cbaa-11e8-85bb-9b57687ffeb4′]
दक्ष रोबोटमुळे बॉम्ब शोधक व नाशक पथकाचे एक प्रकारे अत्याधुनिकरण झाले आहे. हा रोबोट बॉम्ब हाताळून तो नष्टही करु शकतो. यासंदर्भात रोबोटचे छायाचित्र टाकत पुणे पोलीस दलातील नवीन मेंबरला भेटलात का ? असे ट्विट पोलीस आयुक्तांनी केले आहे.
पुण्यातील साखळी बॉम्ब स्फोटाच्या घटनेनंतर पोलीस दलाच्या सक्षमीकरणासाठी केंद्र व राज्य सरकारकडून कोट्यवधी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. मात्र स्फोटके व घातक वस्तूचा शोध व त्याचा नाश करण्यासाठी प्रगत देशामध्ये वापर केल्या जाणाऱ्या रोबोची महाराष्ट्र पोलीस दलाकडे कमतरता होती. पुणे पोलीस दलात नव्याने दाखल होणाऱ्या या रोबोटमुळे ही कमतरता भरुन निघणार आहे. अतिरेक्यांच्या ‘टार्गेट’वर असलेल्या पुण्यामध्य पहिल्यांदा त्याचा वापर करण्यात येणार आहे.
[amazon_link asins=’B071HWTHPH,B0756Z53JN’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’0d3b5b69-cbab-11e8-8e8f-35384771df4e’]
पोलिसांचं सर्च ऑपरेशन सुरु
पालघर: डहाणू तालुक्यातील चिखले गावात समुद्रामार्गे ४ संशयित आल्याच्या संशयावरुन खळबळ उडाली.  पालघर पोलिसांनी या परिसरात रात्रीपासून सर्च ऑपरेशन सुरु केलं आहे. हे सर्च ऑपरेशन चिंचणी,नरपड,चिखले,बोर्डी भागात सुरु आहे. काल संध्याकाळी एक मोटर सायकलस्वाराने चिखले गावच्या हद्दीत समुद्र किनाऱ्यावरुन लगबगीने ४ व्यक्ती रस्ता ओलांडून, चिखले गावच्या हद्दीत जाताना पाहिले. संशय आल्याने त्याने वाणगांव पोलिसांशी संपर्क साधला. वाणगांव पोलिसांनी घोलवड पोलिसांना याबाबतची माहिती दिल्यानंतर, पोलिसांनी चिखले गावात शोधमोहीम सुरु केली आहे. या शोधमोहिमेमुळे सोशल मीडियावरुन विविध अफवांना पेव फुटले आहे. काल रात्रीपासून ही शोधमोहिम सुरु आहे. गावातील लोकांनीही या शोधकार्यात पोलिसांना सहकार्य केलं. सुरक्षिततेच्या उपाययोजना आखल्या जात आहेत. दरम्यान, पोलिसांनी अफवा न पसरवण्याचं आवाहन केलं आहे. सध्या पोलीस तपास करत आहेत, त्यामुळे सोशल मीडियावर अफवा पसरवणारे मेसेज फॉरवर्ड करु नका, असं आवाहन पोलिसांनी केलं आहे.
[amazon_link asins=’B01I59VBLO,B016EOZ7OO’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’4bb2b83b-cbab-11e8-927b-051c838321bd’]