5 वर्षे विनंती केल्यानंतर पुढील महिन्यात लाँच होणार दलाई लामा यांचा म्युझिक अल्बम !

पोलीसनामा ऑनलाईन टीम : तिबेटचे निर्वासित पंतप्रधान दलाई लामा यांनी एका विशेष विनंतीवरून इनर वर्ल्ड (Inner World) हा म्युझिक अल्बम लाँच करण्याचा निर्णय घेतला आहे. जुलैमध्ये हा अल्बम लाँच केला जाणर आहे. 5 वर्षांपूर्वी बँकेत काम करणाऱ्या जुनेल कुनिन (Junelle Kunin) हिनं दलाई लामा यांनी दिलेल्या शिकवणीवर आधारीत म्युझिक शोधलं जेणेकरून ती स्वत:ला शांत ठेवेन आणि पुढील जीवनावर फोकस करेन. परंतु तिला हे ऑनलाईन मिळालं नाही. नंतर कुनिननं यासंदर्भात दलाई लामा यांच्या ऑफिसशी संपर्क साधला. तिचा हा प्रस्ताव नम्रतेनं नाकारण्यात आला.

भारतातील एका ट्रीपदरम्यान कुनिननं मोठ्या मुश्किलीनं लामा यांची भेट घेतली आणि आपली विनंती त्यांना सांगितली. अखेर आता 5 वर्षांनंतर त्यांचा अल्बम लाँच होणार आहे. यात त्यांनी दिलेली शिकवण आणि मंत्र यांचा समावेश आहे. 6 जुलै रोजी लामा यांच्या वाढदिवसानिमित्त हा अल्बम लाँच केला जाणार आहे. कुनीन म्हणाली की, “मी असं बोलताना त्यांनी कधीच पाहिलं नव्हतं ते खूप उत्साहित होते. त्यांनी मला समजावलं की, संगीत किती महत्त्वाचं आहे. त्यांचे डोळे चमकले. संगीत विविध पार करून आपला वास्तविक स्वभाव परत करू शकतो.”

बुकलेटसोबत लाँच होणार म्युझिक
11- ट्रॅक प्रोजेक्टला एका बुकलेटसोबत प्रसिद्ध केलं जाणार आहे. कुनिनचा पती अब्राहम आणि कुनिनं यांनी या अल्बमवर 5 वर्षे काम केलं आहे. कुनिनच्या संगीतकार आणि निर्माता पती अब्राहमनं तिला या अल्बमसाठी खूप मदत केली आहे. कुनिन म्युझिशियन असून तिनं बौद्ध धर्माचा स्विकार केला आहे. ग्रॅमी नॉमिनेटेड सितार वादक अनुष्का शंकर या अल्बममध्ये गेस्ट अपीरंस देताना दिसणार आहे. अनुष्का शंकरनं सांगितलं की, यात मिळालेलं निमंत्रण एक मोठा सन्मान आहे.