डेल स्टेननं ‘मास्टर ब्लास्टर’ सचिनला ‘महान’ फलंदाज म्हटलं, पण केली ‘ही’ मोठी ‘चूक’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज वेगवान फलंदाज डेल स्टेनने रविवारी (दि.12) जगातील काही निवड फलंदाजांची नावे जाहीर केली आहेत ज्यांना तो सर्वोत्तम खेळाडू मानतो. भारताच्या सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविड यांना स्टेनने जगातील सर्वोत्तम फलंदाजांच्या यादीत स्थान दिले आहे. या दोन फलंदाजांनी एक दिवसीय आणि कसोटी या दोन्हीमध्ये 10 हजारा पेक्षा अधिक धावा केल्या आहेत आणि या दोघांनी अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत.दक्षिण आफ्रिका , डेल स्टेन,सचिन तेंडुलकर , राहुल द्रविड

सचिनला त्याच्या शानदार स्ट्रोक खेळासाठी त्याला ‘मास्टर ब्लास्टर’ नावाने ओळखले जाते. तर राहुल द्रविडला विकेटसाठी ‘द वॉल’ म्हणून ओळखले जाते. रविवारी दक्षिण आफ्रिकेचा गोलंदाज स्टॅन याने ट्विटरवर चाहत्यांच्या प्रश्नांची उत्तर देताना एक चूक केली आहे. त्याने द्रविड ऐवजी सचिनला ‘द वॉल’ म्हटले. स्टॅनीनला त्याने केलेल्या चुकीची माहिती नाही. असे असले तरी चाहत्यांना सचिनला ‘मास्टर ब्लास्टर’ तर द्रविडला ‘द वॉल’ म्हणणे पसंत आहेत.

ट्विटरवर प्रश्न-उत्तराच्या सत्रात एका चाहत्याने स्टॅनला विचारले की, सर्वोत्कृष्ट फलंदाजाचे नाव सांगा ज्याच्या सोबत आपण खेळला आहात. याला उत्तर देताना स्टॅनने म्हटले की, जे सर्वोत्कृष्ट फलंदाज आहेत अशा सर्वांसोबत मी खेळलो आहे. पॉन्टिंग त्याच्या यशाच्या शिखरावर होता, सचिन वॉल प्रमाणे होता, द्रविड, गेल केपी हे देखील सर्वोत्कृष्ट फलंदाज होते, असे उत्तर स्टॅनने दिले.

स्टॅनने ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-20 वर्ल्डकपबद्दल शंका व्यक्त केली. करोना विषाणूच्या संसर्गामुळे यावर्षी ऑक्टोबरमध्ये खेळवण्यात येणारी आयसीसी स्पर्धा संकटात सापडली आहे. याबाबत एका चाहत्याने टी 20 बाबत त्याला त्याचे मत विचारले असता, त्याला स्टॅनने उत्तर देताना म्हटले की, हे असं होणार आहे का ? असा सवाल त्याने उपस्थित केला.