‘CAA’ ला पाठिंबा दर्शविल्यानं एका ‘मुस्लिम’ कुटुंबानं केलं ‘दलित’ वस्तीचं पाणी बंद

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – नागरिकत्व सुधारणा कायद्याला पाठिंबा दर्शविण्यासाठी भारतीय जनता पक्षाने आयोजित केलेल्या कार्यक्रमाला तीन लोकांनी हजेरी लावली. हजेरी लावल्याबद्दल राग धरून वलन्चेरी येथील एका दलित वसाहतीचे पिण्याचे पाणी बंद करण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दलित वस्तीच्या बाजूला राहणाऱ्या एका मुस्लीम कुटुंबाने हे पिण्याचे पाणी बंद केले असल्याचा आरोप चेरुकुन्नू दलित वस्तीतील रहिवाशांनी केला आहे. दलित वस्तीला हे मुस्लिम कुटुंब पाणी पुरवित असते. दरम्यान १७ जानेवारीला त्यांच्याकडून पाणी बंद करण्यात आल्याचे तेथील राहणाऱ्या रहिवाशांनी सांगितले. दरम्यान नागरिकत्व सुधारणा कायद्याबाबत भारतीय जनता पक्षाने जनजागृती मेळाव्याचे आयोजन केले होते. या मेळावा वलन्चेरी या शहरात आयोजित करण्यात आला होता.

या प्रकारची माहिती भारतीय जनता पक्षाच्या एका नेत्यानं आपल्या ट्विटर हँडलवरन दिली. यानंतर महसूल विभागाने हा पाणी पुरवठा सुरू करण्यात यावा यासाठी तातडीने सर्वपक्षीय बैठक आयोजित करून निर्णय घेतला. या वस्तीत राहणारे लोक हे भारतीय जनता पक्षाचे समर्थक आहेत. दरम्यान गेल्या वर्षभरापासून ग्राम पंचायतीची पाणी पुरवठा योजना बंद असल्याची माहिती येथील ग्रामस्थांनी दिली त्यामुळे आम्हाला पाण्यासाठी १ किमी च्या अंतरावर पायी जावं लागत असल्याचं देखील त्यांनी सांगितलं.

काही दिवसांपूर्वी या वस्तीतील एका मुस्लीम कुटुंबाने आपल्याकडे असलेले पाणी या दलित वस्तीला देण्यासाठीची सोय केली. हे कुटुंब या वस्तीतील प्रत्येक कुटुंबाला मोजून तीन बादल्या पाणी देत असे. दरम्यान शुक्रवारी, दलित वस्तीमधील तीन लोक भारतीय जनता पक्षाच्या सीएए कायद्याच्या समर्थनार्थ आयोजित केलेल्या कार्यक्रमाला हजर राहिले. त्यानंतर त्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. हे पाहिल्यानंतर इतर मुस्लीम समाजाच्या लोकांनी भाजप समर्थकांना पाणी पुरवठा करणाऱ्या त्या मुस्लीम कुटुंबावर आक्षेप घेतला. त्यामुळे या कुटुंबानं या दलित वस्तीचं पाणी बंद करण्याचा निर्णय घेतला. मात्र मुस्लिम कुटुंबातील सदस्य सैनुद्दीन कलप्पडथील यांनी सांगितलं की पाणी बंद करण्याचा आणि सीएएचा कसलाही संबंध नाही.

दरम्यान तिरुरचे तहसीलदार टी मुरली यांनी स्पष्ट केले की, या दलित वस्तीतील लोकांनी जो काही आरोप केला आहे त्याची चौकशी लवकरच करण्यात येईल आणि दलित वस्तीला लवकरच पाणी पुरवठा करण्यात येईल असं देखील त्यांनी सांगितलं.

फेसबुक पेज लाईक करा –