क्रूरपणाचं शिखर ! अनैसर्गिक बलात्कार केल्यानंतर फासावर लटवलं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था : अरवली जिल्ह्यातील मोदसा तालुक्यात एक माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली आहे. एका दलित विद्यार्थिनीवर नराधमांनी अनैसर्गिक बलात्कार केला आणि फासावर लटकवले. शवविच्छेदनाच्या दुसऱ्या अहवालात ही मन सुन्न करणारी बाब समोर आली.

या प्रकरणाचा तपास करणारे सीआयडी अधिकाऱ्यांनी सांगितले की मुलीच्या अंगावर खूप जखमा असुन तिला जबरदस्तीने घसपटत नेले असल्याचा अंदाज त्यांनी वर्तवला. या विद्यार्थिनीचा मृतदेह ५ जानेवारीला एका झाडाला लटकवलेल्या अवस्थेत मिळाला. शवविच्छेदन अहवालात नमूद करण्यात आले आहे की बलात्कार करणाऱ्या नराधमांनी मुलीवर अतिशय क्रूरपणे अत्याचार केले आहेत.

या विद्यार्थिनीच्या गुदद्वारात जखमा आढळल्या आहेत. गुदद्वाराचा शरिरातील एक भाग शरिराबाहेर आला असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. त्याव्यतिरिक्त पूर्ण शरीरावर जखमा आढळून आल्या आहेत आणि बळजबरीनं विद्यार्थिनीला फासावर लटकवण्यात आले असल्याचे तिच्या गळ्यावरील जखमांवरून आढळून आले. शवविच्छेदनाच्या दुसऱ्या अहवालामुळे पहिल्या शवविच्छेदनाच्या अहवालावर गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. कारण पहिल्या अहवालात मुलीवर बलात्कार अथवा हत्या झाली नसल्याचे नमूद करण्यात आले होते.

एक आरोपी फरार

दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी बिमल भारवाड आणि त्याचे मित्र दर्शन भारवाड, सतीश भारवाड आणि जिगर विरोधात गुन्हा दाखल केला आहे. यातील तिघांनी पोलिसांसमोर आपला गुन्हा कबूल केला आहे तर त्या चौघांपैकी एक सतीश भारवाड हा फरार आहे.

स्थानिकांनी आरोप केला होता की पोलिस या प्रकरणात गंभीरपणे लक्ष घालत नव्हते. कारण १ जानेवारीला मुलगी बेपत्ता झाली होती आणि याबाबत तिच्या कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार दाखल केली होती मात्र, पोलिसांनी तक्रार दाखल करून घेण्यास नकार दिला होता. नंतर ५ जानेवारी रोजी विद्यार्थिनीचा मृतदेह एका झाडाला लटकवलेल्या अवस्थेत आढळून आला. यानंतर तेथील स्थानिकांनी मोठे आंदोलन केले आणि याचे पडसाद सोशल मीडियावरही उमटले. त्यानंतर या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे सोपवण्यात आला होता.

फेसबुक पेज लाईक करा –