केवळ जेवणाला हात लावला म्हणून दलित युवकाची हत्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम –  छत्तरपूर जिल्ह्यात धक्कादायक असा प्रकार उघडकीस आला आहे. जेवणास आपल्यापूर्वी हात लावल्याच्या कारणावरुन दलित तरुणाची हत्या करण्यात आली आहे. ७ डिसेंबरला ही घटना घडली आहे.

मिळलेल्या माहितीनुसार, “७ डिसेंबर रोजी जेवणासाठी एकत्र आले असता देवराज या दलित तरुणाने जेवणाला आपल्यापूर्वी हात लावल्याने आरोपींचा राग अनावर झाला. तेव्हा दोघांनी देवराजला काठीने मारहाण केली. मारहाणीत देवराज बेशुद्ध झाला. आरोपींनी त्यानंतर त्यास त्याच्या घरी सोडले असता काही वेळातच त्याने आपले प्राण सोडले.”

भुरा सोनी आणि संतोष पाल असे आरोपींचे नावे आहेत. देवराजच्या कुटूंबीयाने दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी या दोघांविरुद्ध हत्येचा गुन्हा नोंद केला आहे.

छत्तरपूरचे एसएसपी समीर सौरभ म्हणाले, “दोन्ही आरोपींनी देवराजाच्या घरुन त्याला जेवणासाठी नेले. दोन तासांनी त्यांनी देवराजाला घरी आणून सोडले. आपल्यापूर्वी जेवणास हात लावला म्हणून त्याला मारहाण झाल्याचा आरोप कुटूंबीयांनी केला.” दरम्यान, देवराजाच्या शरीरावर पोलिसांना जखमा आढळून आल्या असून, हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस सध्या आरोपींचा शोध घेत आहेत.