धक्‍कादायक ! लग्नास नकार देणाऱ्या प्रियकराच्या गुप्तांगवार प्रेयसीने केले वार

भिवंडी : पोलीसनामा ऑनलाईन  – लग्नास नकार देणाऱ्या प्रेयसीने प्रियकराच्या गुप्तांगावर धारदार शस्त्राने वार केल्याची खळबजनक घटना भिवंडीमध्ये घडली आहे. या घटनेत प्रियकर गंभीर जखमी झाला असून पोलिसांनी प्रेयसीला अटक केली आहे. हा प्रकार भिवंडी येथील केजीएन चौकातील नवीवस्ती येथे शनिवारी रात्री घडला. फकरू फजदरु रेहमान खान (वय-३०) असे प्रियकराचे नाव असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

फकरुच्या शेजारी राहणाऱ्या ३० वर्षीय महिलेसोबत त्याचे मागील एक वर्षापासून प्रेमसंबंध होते. ही महिला पतीपासून विभक्त राहत असून तिने शारिरीक भूक भागवण्यासाठी फकरूसोबत प्रेमसंबंध जोडले होते. शनिवारी रात्री फकरू तिच्या घरी झोपण्यासाठी गेला होता. त्यावेळी तिने लग्नासंबंधी त्याच्याकडे विचारणा केली. त्याने लग्नास नकार दिला. या कारणावरून दोघांमध्ये वाद झाले. संतापलेल्या महिलेने धारदार विळ्याने त्याच्या गुप्तांगावर वार केले.

हा प्रकार शेजाऱ्यांना समजताच त्यांनी जखमी फकरूला रुग्णालयात दाखल केले. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत महिलेला अटक केली. पोलिसांनी प्रेमाचे नाटक करून शारिरीक भूक भावण्यासाठी तिचा उपभोग घेतल्याप्रकरणी फकरूवर बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.

‘या’ गोष्टींचे सेवन करणाऱ्या महिलांना कधीही होत नाही ‘ब्रेस्ट कॅन्सर’

रोज सकाळी ‘मनुक्यांचे पाणी’ प्या आणि मिळवा ‘हे’ आश्चर्यकारक फायदे

रक्ताचा अभाव, कॅन्सरसारख्या गंभीर आजारांवर ‘पांढरा कांदा’ उपयोगी

सावधान ! ‘गहू’ आरोग्यासाठी नुकसानकारक

उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी ७ उपाय

‘तळहात’ पाहून सुद्धा ओळखू शकता, तुम्हाला आहे कोणता आजार ?