दादरा-नगर हवेलीचे खासदार मोहन देलकर यांचा मृतदेह हॉटेलमध्ये आढळला, आत्महत्या केल्याचा संशय, प्रचंड खळबळ

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दादरा-नगर हवेलीचे अपक्ष खासदार मोहन देलकर यांचा मृतदेह मुंबईतील एका हॉटेलमध्ये आढळला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणाचा तपास सुरु केला असून, सध्या ही आत्महत्या असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
Dadra and Nagar Haveli MP Mohan Delkar allegedly died by suicide at a hotel in South Mumbai. His body has been sent for postmortem. Further investigation is underway. More details awaited. pic.twitter.com/JRuMFTDUoe
— ANI (@ANI) February 22, 2021
मोहन देलकर हे 58 वर्षांचे होते. ते दादरा-नगर हवेली लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्त्व करत होते. भारतीय नवशक्ती पक्षाकडून त्यांनी निवडणूक लढवली होती. त्यामध्ये ते निवडूनही आले होते. 1989 मध्ये पहिल्यांदा ते निवडून आले होते. त्यानंतर अनेकवेळा ते खासदारही राहिले होते. 2009 मध्ये त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. मात्र, लोकसभेची निवडणूक अपक्ष म्हणून लढवली होती त्यामध्ये ते विजयी झाले होते.
Maharashtra: Dadra and Nagar Haveli MP Mohan Delkar allegedly died by suicide at a hotel in South Mumbai. His body has been sent for postmortem. Police present at the spot, investigation being carried out. More details awaited. pic.twitter.com/8iDrOxbUuA
— ANI (@ANI) February 22, 2021
दरम्यान, देलकर यांचा मृतदेह मुंबईतील मरीन ड्राईव्ह परिसरातील एका हॉटेलमध्ये आढळला आहे. त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून, त्याचा रिपोर्ट आल्यानंतरच याप्रकरणाचा उलगडा होऊ शकेल.