बाईकच्या सायरनवर ‘गली बॉय’चा जबरदस्त ‘डान्स’ (व्हिडिओ)

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – नागरिक आपल्या घराच्या बाहेर कार किंवा दुचाकी पार्क करतात. पार्क केलेल्या वाहनांची चोरी किंवा नुकसान करू नये यासाठी वाहनांना सायरन लावला जातो. जेणे करून सायरन वाजल्यानंतर गाडीचे नुकसान किंवा चोरी होत असल्याचे समजेल. मात्र, याच सायरनवर एका गली बॉय डान्स करतानाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. त्याच्या जबरदस्त डान्सला नेटकऱ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये, एक दहा ते अकरा वर्षाचा मुलगा घरातून काही सामान घेऊन बाहेर येतो. घराबाहेर पार्क केलेल्या दुचाकीला बघून तो त्या ठिकाणी थांबून गाडीवर पाय ठेवतो. त्याचवेळी बाईकला बसवण्यात आलेला सायरन वाजायला सुरुवात होते. त्यानंतर या लहान मुलाने केलेल्या डान्स बघण्यासारखा आहे.

बाईकचा सायरन सुरु होताच मुलगा डान्स करण्यास सुरुवात करतो. सायरनच्या आवाजानुसार तो आपल्या डान्सची स्टेप बदलतो. मुलाचा हा डान्स बघण्यासारखा असून डान्स करताना तो आपल्या तोंडाची हालचाल अशी करतो बघणाऱ्याला वाटते तो तोंडातूनच आवाज काढत आहे. त्याच्या तोंडाची हालचाल आणि सायरनचा आवाज एकमद मिळता जुळता वाटतो. दरम्यान, डान्स करत असताना त्याची आई त्याला आवज देते आणि तो सामान घेऊन घरात पळून जातो.

३५ सेकंदाच्या हा व्हिडिओ लोक मोठ्या प्रमाणात व्हायरल करून त्याचा आनंद घेत आहेत. एवढेच नाहीतर सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओची भुरळ प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा यांना देखील घातली आहे. आनंद महिंद्रा यांनी हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे.

आरोग्यविषयक वृत्त –