‘लॉकडाऊन’चा भंग केला म्हणून पोलिसांनी करायला लावला सपना चौधरीच्या गाण्यावर डान्स ! (व्हिडीओ)

पोलिसनामा ऑनलाइन –उत्तर प्रदेशातील इटावा जिल्ह्याच्या सदर कोतवाली क्षेत्रातील शहर पोलीस चौकीत एका युवकाला डान्स करायला लावण्याचा प्रकार समोर आल्याचं सांगितलं जात आहे. या प्रकरणी चौकीच्या प्रभाऱ्याचे अधिकार काढून घेण्यात आले आहेत.

सदर पोलिसांनी युवकाला स्टार डान्सर सपना चौधरीचं प्रसिद्ध गाणं तेरी आख्या का यो काजल या गाण्यावर डान्स करायला लावला होता. या घटनेचा एक व्हिडीओ देखील समोर आला आहे जो सोशलवर झपाट्यानं व्हायरल होत आहे.

पोलीस अधीक्षक (नगर) राम यश यांनी सांगितलं की, कोतवाली सदर क्षेत्रांतर्गत नया शहर चौकी कक्षांच्या अंतर्गत युवकाचा शनिवारी हरियाणवी गाण्यावर डान्स करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यांनी सांगितलं की, व्हिडीओत एक महिला कॉन्स्टेबलसह काही पोलीस कर्मचारीही डान्स करताना आढळले आहेत.

त्यांनी सांगितलं की, वरिष्ठ पोलीस अधीक्षक आकाश तोमर यांनी पोलिसांच्या प्रतिमेला कलंक लावणाऱ्या या व्हिडीओची दखल घेत पोलीस चौकीचे प्रभारी विश्वनाथ मिश्रा यांचे अधिकार काढून घेतले आहेत.