युजवेंद्र चहलची वागदत्त वधू Dhanashree चा आणखी एक डान्स व्हिडिओ वायरल, ‘चने के खेत में’ गाण्यावर केले नृत्य

दुबई : वृत्तसंस्था – क्रिकेटर युजवेंद्र चहलची वागदत्त वधू धनश्रीला तुम्ही ओळखत असालच. तिच्या डान्सिंग स्टाइलची चर्चा नेहमीच होत असते. सोशल मीडियावर ती खुप अ‍ॅक्टिव्ह असते आणि यासाठी तिचा प्रत्येक व्हिडिओ येताच वायरल होतो. आता धनाश्री वर्माचा आणखी एक डान्स व्हिडिओ समोर आला आहे, तो सुद्धा खुप पसंत केला जात आहे.

माधुरी दीक्षितच्या गाण्यावर डान्स
धनश्रीचा जो व्हिडिओ वायरल झाला आहे, त्यामध्ये ती यावेळी माधुरी दीक्षितच्या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. तिने ’चने के खेत में’ गाण्यावर जबरदस्त डान्स केला, ज्यावर लोकांनी शिट्या वाजवण्यास सुरूवात केली. हा व्हिडिओ डान्स फॅकल्टीने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेयर केला आहे, ज्यास हजारो व्ह्यूज मिळाले आहेत. ब्लू टॉप आणि ग्रे जीन्समध्ये दिसत असलेल्या धनाश्रीचा डान्स पाहून लोक शिट्ट्या वाजवण्यापासून स्वत:ला रोखू शकत नसल्याचे दिसत आहे. मात्र, हे पहिल्यांदाच होत नाही, यापूर्वी सुद्धा तिचे डान्स व्हिडिओ आले आहेत. डॉक्टर असूनही तिने डान्समध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. तिचे डान्सिंग व्हिडिओ नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असतात.

दुबईच्या बीचवर सुद्धा डान्स
सध्या धनाश्री दुबईत युजवेंद्र चहलच्या सोबत आहे, जेथे आयपीएल मॅच खेळल्या जात आहेत. येथील बीचवर शूट करण्यात आलेला धनश्रीचा डान्स व्हिडिओ जबरदस्त वायरल झाला होता. ज्यामध्ये ती ’नाच मेरी रानी’ गाण्यावर डान्स करताना दिसली होती. हा व्हिडिओसुद्धा लोकांना खुप पसंत पडला होता.

फोटो आणि व्हिडिओ शयर करतात युजवेंद्र आणि धनश्री
युजवेंद्र आणि धनश्रीचा साखरपूडा काही महिन्यांपूर्वी झाला आहे. ज्याची माहिती दोघांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून दिली होती. आता दोघेही दुबईत सोबत वेळ घालवत आहेत. दुबईतून दोघे आपले फोटो आणि व्हिडिओ शेयर करत असतात. नुकतेच त्यांचे काही फोटो समोर आले होते, ज्यामध्ये युजवेंद्रने कॅपशनमध्ये लिहिले होते -‘ये मेरी परफेक्ट शाम है.‘