धक्कादायक ! लग्नात दुसऱ्या महिलेबरोबर Dance केल्यावरून वाद; पतीकडून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या 

जयपूर : वृत्तसंस्था- लग्न समारंभात पतीने दुसऱ्या महिलेसोबत डान्स केल्यावरून पती-पत्नीत झालेला वाद पत्नीच्या जीवावर बेतला. विकोपाला गेलेल्या या वादातून पतीने पत्नीची कुऱ्हाडीने वार करून हत्या केली. ही भयंकर घटना जयपूरमध्ये घडली आहे. काशूराम (वय -६०) असे आरोपीचे नाव असून, तो फरार आहे. भीखली असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. ते जयपूरमधील टिंडोरी गावात राहत होते.

मिळालेल्या माहितीनुसार, काशूराम २४ मे रोजी पत्नीसह एका नातेवाईकाच्या लग्नाला गेले होते. लग्नात काशूराम याला नाचण्यासाठी एका नातेवाईकाने आग्रह केला. काशूरामही इतरांबरोबर डान्स करू लागला. त्याचवेळी एका गाण्यावर नाचताना काशूराम आणि एक महिला समोरासमोर आले. आपला पती दुसऱ्या महिलेबरोबर डान्स करत असल्याचे बघून भिखलीला राग आला. घरी गेल्यावर भिखली व काशूराम यांच्यात यावरून जोरदार भांडण झाले. हे भांडण एवढे टोकाचे होते की चिडलेल्या काशूरामने जवळच पडलेल्या कुऱ्हाडीने भीखलीवर वार केले. त्यात ती जागीच ठार झाली. त्यानतर काशूरामने तिथून पळ काढला. काशूरामवर भारतीय दंड संहिता कलम ३०२ च्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.