‘नागीण’ डान्स नव्हे तर चक्क ‘नागिणी’सोबतच डान्स, तळीरामाची झाली ‘पिवळी’ (व्हिडीओ)

दौसा/राजस्थान : वृत्तसंस्था – ज्याच्या एका फुत्कारानं अंग थरथर कापायला लागतं अशा कोब्रा नीगिणी सोबत एका तळीरामाने चक्क नागीण डान्स केल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. भारतात नागिण डान्स प्रचंड लोकप्रिय आहे. लग्नसमारंभात तळीराम नागीण डान्स करताना तरुण दिसून येतात. मात्र सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओतील तळीरामाचा खराखुरा नागीण डान्स अंगाचा थरकाप उडवणारा आहे. हा व्हिडिओ राजस्थानमधील दौसा इथला असल्याची माहिती मिळत आहे.

नशेत धुंद असलेल्या या तळीरामाचा सापासोबत अर्धातास खेळ सुरु होता. सापाने त्याच्या तावडीतून सुटण्याचा प्रयत्न केला. मात्र, मद्यधुंद तरुण सापाला सोडत नव्हता. अख्खा गाव हा सगळा गोंधळ पहात होता, व्हिडीओ काढले जात होते. परंतु त्याला सापासोबतचा खेळ थांबवण्यासाठी कोणी पुढे सरसावण्याची हिंमत केली नाही. या मद्यपीने सापाची वाट अडवलीच एवढेच नाही तर तिला कविता ऐकवून गळ्यात घालून घेतले.

तळीरामाचा सापा सोबतच्या डान्सचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा तळीराम नागिणीसोबत नाचत असून कधी तिच्यासमोर झोपतो तर कधी त्याला गळ्यात घालून घेतो. यामध्ये चवताळलेल्या नागिणीने त्याला अनेकवेळा डसले. डसल्यामुळे तो व्यक्ती काळा निळा पडला. त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या ग्रामस्थांनी त्याला तात्काळ जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखले असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत.

Visit : Policenama.com

शिल्पा ने रविवार को लखनऊ में लिया मक्खन मलाई का आनंद
जब अचानक आमिर खान की बेटी इरा कूद-कूद कर नाचने लगी
दीपिका कक्कड़ ने एयरलाइन पर गैर-पेशेवर बर्ताव का आरोप लगाया
‘या’ ‘BOLD’ मराठमोळ्या अभिनेत्रीच्या साडीतील लुकची सोशलवर ‘चर्चा’ !
अभिनेत्री कॅटरीना कैफच्या ‘रेड’ साडीतल्या ‘देसी लुक’ची चाहत्यांना ‘भुरळ’ !
डायरेक्टरसोबत झोपयला नकार दिल्यानं ‘या’ अभिनेत्रीनं गमावले बिग बजेट प्रोजेक्ट !
मराठामोळी ‘लॅम्बोर्गिनी गर्ल’ हर्षदा विजयच्या ‘BOLD’ फोटोंचा सोशलवर ‘धुमाकूळ’ !
अभिनेत्री ‘कियारा आडवाणी’नं घातला चकणारा ‘हिरवा’ ड्रेस, चाहते म्हणाले- ‘तोतापरी’ !
अभिनेत्री उर्वशी रौतेलानं केलेला आतापर्यंतचा ‘SEXY’ डान्स सोशलवर ‘ट्रेंडिंग’ ! (व्हिडीओ)

‘ही’ ‘BOLD’ अभिनेत्री पिण्याच्या पाण्यासाठी 1 दिवसाला करते चक्क 4000 रुपयांचा ‘खर्च’ !
अभिनेत्री दिशा पाटनी रात्र अविस्मरणीय बनवण्यासाठी काय करते ? जाणून घ्या बेडरूम ‘सिक्रेट’ !