हरियाणवी डान्सर आणि गायक सपना चौधरीचा भाजपमध्ये प्रवेश

नवी दिल्‍ली : पोलीसनामा ऑनलाइन – हरियाणवी डान्सर आणि गायक सपना चौधरीने अखेर भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. रविवारी सकाळी ती दिल्‍ली येथे भाजपच्या एका कार्यक्रमात सहभागी झाली होती. मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी सपना चौधरी हिला भाजपची सदस्य करून घेतले आहे. गेल्या अनेक महिन्यांपासुन सपना चौधरीच्या राजकिय इनिंगबाबत चर्चा रंगली होती. कधी काँग्रेस तर कधी भाजपमध्ये प्रवेश केल्याच्या वावडया उठत होत्या. तिने लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपचा प्रचार देखील केला होता. आज (रविवार) अखेर शेवटी तिने अधिकृतरित्या भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

सपना चौधरीने भाजपमध्ये प्रवेश करून सर्वांना आश्‍चर्याचा धक्‍काच दिला आहे. भाजपच्या कार्यक्रमामध्येच तिने सदस्यत्व घेतले. यावेळी मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान, खासदार मनोज तिवारी, हर्षवर्धन सिंह यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते. राजधानी दिल्‍ली येथे जवाहर लाल नेहरू स्टेडियममध्ये भाजपचे सदस्य नोंदणी अभियान सुरू आहे. त्या अभियानादरम्यानच सपना चौधरीने भाजपची सदस्यता घेतली आहे. लोकसभा निवडणुकीच्या वेळी सपना चौधरी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगली होती. मात्र, त्यावेळी स्वतः सपनाने प्रसारमाध्यमांच्या समोर जावुन काँग्रेस प्रवेशाची चर्चा केवळ चर्चाच असल्याचे सांगितले होते. त्यानंतर सपनाने मनोज तिवारी यांच्यासोबत भाजपचा लोकसभा निवडणुकीसाठी प्रचार केला होता. निवडणुकी दरम्यान सपनाने दिल्‍लीमध्ये भाजप उमेदवारांसाठी अनेकवेळा रोड शो देखील केले होते. आज अखेर सपना चौधरीने भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

आंब्याची पानेही आरोग्यासाठी आहेत ‘फायदेशीर’

पावसाळ्यात खा भरपूर ‘जीवनसत्व’ असलेला आरोग्यदायी ‘राजमा’

स्तनाचा कॅन्सर, डायबेटीजचा धोका कमी करण्यासाठी ‘हे’ सेवन करा

रोग प्रतिकारशक्तीवर परिणामकारक ठरतात ‘या’ गोष्टी

दररोज ४ काजू, ८ मनुका सेवन करा, झटपट बरे होतील ‘हे’ आजार

असे ठेवा ‘मेंदू’वर नियंत्रण, जाणून घ्या ‘हे’ सोपे उपाय