70 वर्षांच्या डॉक्टरनं केला हृतिक रोशन सारखा ‘डान्स’, उडाली ‘खळबळ’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था : आधी डान्सर अंकल आणि नंतर डान्सर चाचा आणि आता डान्सर डॉक्टरने इंटरनेटच्या जगात खळबळ उडवली आहे. या डॉक्टरांचे वय ७० वर्ष आहे परंतु एका कार्यक्रमात हे मुलांचे डॉक्टर मुलांप्रमाणे नाचताना दिसले. ७० वर्षांच्या वृद्ध डॉक्टरांचा डान्स हृतिक रोशनच्या डान्स सारखा दिसत होता.

मुलांचे विशेषज्ञ डॉक्टर गेल्या काही दिवसांत जेव्हा मंचावर डान्स करतात तेव्हा मुलांनाही त्यांचा हेवा वाटू लागला. राज धारीवाल असे या डॉक्टरचे नाव असून ते जोधपूर येथील रहिवासी आहेत.

काही दिवसांपूर्वी, त्यांच्या एका नातेवाईकाच्या लग्नात जेव्हा ते डॉ. साहेब देवानंद स्टाईलची टोपी आणि स्लीव्हलेस टी-शर्ट परिधान करुन स्टेजवर चढले तेव्हा कोणालाही वाटले नव्हते की ते डान्स करणार आहेत. त्यांनी डान्स देखील असा केला की जो चर्चेचा विषय ठरला.

जेव्हा डॉक्टर साहेबांनी डान्स केला तेव्हा तेथील उपस्थित असणाऱ्या लोकांनी देखील त्यांच्याबरोबर डान्स केला. बघता बघता हा त्यांचा डान्स व्हिडीओ प्रचंड प्रमाणात वायरल देखील झाला.

विशेष म्हणजे डॉ.धारीवाल यांची बायपास पास शस्त्रक्रिया झालेली आहे. ते मधुमेहाचे रुग्ण आहेत. परंतु नियमित योग आणि आपल्या जीवनशैलीमुळे त्यांनी या नृत्यात आपली एनर्जी दाखविली.

डॉक्टर धारीवाल म्हणतात की मला लहानपणापासूनच नृत्याची आवड होती. तसेच माझ्या कुटुंबातील सगळ्यांना डान्स करणे आवडते. नृत्य केल्याने शरीर निरोगी राहते. तसेच ते म्हणतात की एखाद्या व्यक्तीला आत्मविश्वास असेल तर तो काहीही करू शकतो.

फेसबुक पेज लाईक कराhttps://www.facebook.com/policenama/