‘डान्सिंग Scorpio’वर पोलिसांनी केली कारवाई; 41 हजार 500 रुपये दंड

गाजियाबाद : वृत्तसंस्था – जातीचा उल्लेख असलेल्या वाहनांवर कारवाईकरण्यास पोलिसांनी सुरुवात झाली असून वाहन नियमांची कडक अंलबजावणी सुरु आहे. त्या अनुषंगाने उत्तर प्रदेशचे आयपीएस अधिकारी दीपांशू काबरा यांनी डान्सिंग कारचा व्हिडिओ शेअर केला आहे.या कारच्या मालकाला ४१ हजार ५०० रुपये दंडही आकारण्यात आला. या कारवर जातिवाचक उल्लेखही होता.

रविवारी उत्तर प्रदेशच्या गाजियाबाद पोलिसांकडे काही उपद्रवी तरुण रस्त्यावर कर्कश्य आवाजात गाणी वाजवत असून स्टंट देखील करत असल्याची तक्रार आली होती. नसूम अहमद असं गाडीच्या मालकाचं नाव असून तो दिल्लीचा रहिवासी आहे. त्याने आपली स्कॉर्पिओ कस्टमाइज केली होती. आतून-बाहेरुन त्याने गाडी सजवली होती, तसेच मोठमोठे स्पीकरही लावले होते. चालकाने ब्रेक मारल्यानंतर ही कार जोरजोरात हलायची, त्यामुळे बघणाऱ्याला ती डान्सिंग कारप्रमाणे वाटायची.दरम्यान, उत्तर प्रदेश पोलिसांनी गाडी ताब्यात घेतली असून भविष्यात कोणी कार, ट्रॅक्टर किंवा बुलेट मॉडिफाय केल्यास कठोर कारवाई केली जाईल अशी माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे.