डान्सिंग अंकलच्या मेव्हण्यावर भर रस्त्यात झाडल्या गोळ्या

ग्वालियर : वृत्तसंस्था- 

सोशल मिडियाच्या माध्यामातून डान्सिंग अंकल नावाने प्रसिद्ध झालेले विदिशाचे प्राध्यापक संजीव श्रीवास्त हे ज्या मेव्हण्याच्या लग्नात नाचले आणि प्रसिद्ध झाले त्याच मेव्हण्याला एका अज्ञात इसमाने भर रस्त्यात गोळी घालती आहे. कुशाग्र असे त्याचे नाव असून, त्याची परिस्थिती मात्र सध्या गंभीर आहे. त्याला उपचारासाठी स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
[amazon_link asins=’B0785JJF7L’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’eeb2f5de-88f9-11e8-80b2-5b41c9d04e0c’]

सदरची घटना ग्वालियरच्या जनक गंज ठाणा परिसरात घडली आहे. या घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. घटनेचा थरार पाहणाऱ्या लोकांनी कुशाग्रला तात्काळ रुग्णालयात दाखल केले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलीस आसपासच्या परिसरात लावलेल्या सीसीटीव्हींच्या आधारवर आरोपींचा शोध घेत आहेत. अपघाताची माहिती मिळताच संजीव श्रीवास्तव ग्वालियरला दाखल झाले आहेत.