खा. नवनीत राणा कौर यांचा ‘दांडीया आणि गरबा नृत्या’चा व्हिडीओ प्रचंड व्हायरल ! (व्हिडीओ)

अमरावती : पोलीसनामा ऑनलाईन – आजपासून सगळीकडे नवरात्री उत्सवाला सुरुवात होत आहे. घराघरात आणि सार्वजनिक मंडळात घटस्थापना झाली आहे. नवरात्री उत्सवात दांडीया आणि गरबाची धूम पाहण्यासारखी असते. सध्या एक व्हिडीओ समोर आला आहे. यात अमरावतीच्या खासदार नवनीत राणा कौर गरबा नृत्य करताना दिसत आहे. गरबाच्या तालावर थिरकताना नवनीत राणा कौर यांचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड गाजताना दिसत आहे.

नवरात्री उत्सवाच्या निमित्ताने अमरातवीत जिल्ह्यात सर्वत्र युवती आणि महिलांसाठी खास प्रशिक्षण आयोजित केलं आहे. अमरावतीमधील रचना नारी मंचानेही दांडीया नृत्याच्या प्रशिक्षणाचं आयोजन केलं आहे. नवनीत राणा कौर यांनीही हजेरी लावत या प्रशिक्षणात सहभाग घेतला होता. यावेळी खास अंदाजात त्या दांडीया नृत्य आणि गरबा नृत्य करताना दिसून आल्या. यावेळी इतर महिलांनीही दांडीया नृत्याचा आनंद घेतला. त्यांच्या नृत्य करण्याने इतर महिलांमध्ये उत्साह निर्माण झाला.

नवनीत राणा कौर आपल्या नृत्यामुळे सध्या सोशलवर चर्चेत आहे. तसं पाहिलं तर नवनीत राणा कौर या काही पहिल्यांदाच चर्चेत आलेल्या नाहीत.

लोकांमध्ये जाऊन त्यांच्यासोबत काम करताना अनेकदा त्या दिसल्या आहेत. नवनीत राणा कौर अभिनेत्री असून त्यांनी अनेक सिनेमात काम केलं आहे. त्यांनी आतापर्यंत तेलगू, कन्नड आणि मल्याळम सिनेमातही काम केलं आहे. अभिनयातून नवनीत यांनी ब्रेक घेतला आणि त्यानंतर त्या राजकारणात सक्रिय झाल्या. अनेकदा कोणत्या ना कोणत्या कारणाने त्या चर्चेचा हिस्सा बनल्या आहेत. सध्या त्यांचा डान्स मात्र सगळीकडे गाजताना दिसत आहे.

Visit : Policenama.com