दंगल गर्ल बबिता फोगाटची क्रीडा विभागाच्या उप संचालक पदावर नियुक्ती

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी कुस्तीपटू बबिता फोगाटकडे एक मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. हरियाणा राज्य सरकारने बबिताची नियुक्ती क्रीडा विभागाच्या उप संचालकपदावर केली आहे. राज्य सरकारने बबीता सोबत WWE मधील कुस्तीपटू कवीता दलालला देखील या पदावर नियुक्त केले आहे.

हरियाणा सरकारने या दोघींना क्रीडा विभागाच्या उप संचालक पदावर नियुक्त केल्याचे पत्र दिले आहे. बबिताने 2014 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते. तर 2010 ते 2018 या काळात राष्ट्रकुल स्पर्धेत बबिताने रौप्य पदक जिंकले होते. 2012 साली जागतिक कुस्ती चॅम्पियनशिप स्पर्धेत बबिताने रौप्य पदक मिळवले होते. गेल्या वर्षी तिने भाजपमध्ये प्रवेश केला होता.

बबिता फोगाटने भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर सोशल मीडियावर अधिक सक्रिय झाली आहे. सोशल मीडियावरून तीने सातत्याने काँग्रेस व अन्य विरोधी पक्षांवर टीका केल्याचे पहायला मिळत आहे. महाराष्ट्रातील पालघर येथे झालेल्या साधुंच्या हत्येनंतर बबिताने उद्धव ठाकरे सरकारवर टीका केली होती. बबिता हरयाणा पोलिसात उप निरीक्षक होती, परंतु राजकारणात प्रवेश करण्यासाठी तिने नोकरी सोडली.