‘मीदेखील लैंगिक शोषणाची शिकार’ : दंगल गर्लचा धक्‍कादायक खुलासा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – काही दिवसांपूर्वीच मीटू चे वादळ चांगलेच उसळले होते. सध्या हे वादळ काहीसे शमल्याचे दिसत होते परंतु अशातच आता अमिर खानच्या दंगल चित्रपटातील अभिनेत्रीने एक धक्कादायक खुलासा केला आहे. फातिमा सना शेख असं या अभिनेत्रीचं नाव आहे. एका मुलाखतीत बोलताना फातिमाला सेक्शुअल हॅरेसमेंटविषयी प्रश्न विचारण्यात आला. यावेळी बोलताना फातिमा हिने धक्कादायक खुलासा केला आहे. ती स्‍वत: लैंगिक शोषणाची बळी ठरली आहे असे तिने यावेळी सांगितले.

महिलांच्या वाढत्या लैंगिक शोषणाविषयी फातिमाला तिचे मत विचारण्यात आले. यावेळी बोलताना फातिमा म्हणाली की, “या मुद्द्यावर मला अधिक काही बोलायची इच्छा नाही.” असे म्हणत फातिमा हिने तिचेही लैंगिक शोषण झाल्याचे सांगतिले आहे. “परंतु ही घटना मला कोणासोबतही शेअर करायची नाही” असेही ती म्हणाली.

पुढे बोलताना फातिमा म्हणाली की, “मी अशी घटना सार्वजनिकपणे सांगू इच्‍छित नाही. आज हे सर्व इतकं सामान्य झाले आहे की, महिला हे सर्व अगदी सोईस्‍करपणे स्वीकारते. मी माझ्‍या आयुष्‍याला कशाप्रकारे डील करते, या गोष्‍टी मला कोणालाही सांगायच्‍या नाहीत. लोक माझ्‍या निर्णयावरून मला जज करतील, असे मला काही सांगायचे नाही. मी याविषयी माझ्‍या जवळच्‍यांना सांगितले आहे.” असे तिने स्पष्ट केले.

दरम्यान ‘मीटू’ मोहिमेचे कौतुक करत मीटू मोहिमेबाबत बोलताना फातिमा म्हणाली की, “समाजाने लैंगिक शोषणावर बोलणे सुरू केले आहे. या मोहिमेद्‍वारे आपल्‍यासोबत घडलेल्‍या गोष्‍टी तुम्‍ही सर्वांसमोर मांडू शकता. या मोहिमेत ज्‍या लोकांची नावे समोर आली आहेत, ते लाईमलाईट मध्‍ये आले. आता असे करणाऱ्या व्‍यक्‍ती पब्लिकली आणि इंडस्ट्रीला घाबरत आहेत.”

You might also like