PM मोदींनी ‘कोरोना’बद्दल व्यक्त केली चिंता, दिला संपुर्ण महाराष्ट्राला नवा नारा, म्हणाले…

प्रवरानगर : पोलीसनामा ऑनलाइन – देशातील कोरोना संसर्गित रुग्णसंख्या ७२ लाखांच्या आसपास पोहचली आहे. त्यामध्ये सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रातील आहेत. त्याबाबत आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चिंता व्यक्त केली असून, राज्यातील नागरिकांना त्यांनी ‘जबतक दवाई नही, तबतक ढिलाई नही’ असा नवा नारा दिला आहे. प्रवरानगर येथे पद्मश्री. बाळासाहेब विखे-पाटील यांच्या ‘देह वेचावा कारणी’ आत्मचरित्राचे प्रकाशन नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते दूरचित्रसंवादाच्या माध्यमातून बोलत होते.

पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘कोरोनाचा धोका अजून टळलेला नाही तो अजूनही कायम आहे. महाराष्ट्रात कोरोनाची परिस्थिती चिंताजनक आणि जास्त आहे. यामुळे मास्क वापरा, सातत्याने हात स्वच्छ करा, आपला परिसर स्वच्छ राखा, सोशल डिस्टसिंगचे पालन करा,’ असे आवाहन आणि विंनती त्यांनी केली. तद्वतच, ‘अजून कोरोनावर कोणतीही लस आली नाही. म्हणून जोपर्यंत लस मिळत नाही तोपर्यंत ‘जबतक दवाई नही, तबतक ढिलाई नही’, असा नवा नारा मोदींनी सर्व महाराष्ट्रातील नागरिकांना दिला आहे.

केंद्र सरकारच्या योजनांची दिली माहिती

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्र सरकारच्या योजनांची माहिती यावेळी बोलताना सांगितली. ते म्हणाले, ‘शेतकरी काय पिके घेतो, कोणती बियाणे वापरणार, आर्थिक अडचणी काय असणार, पीक विमा त्यासाठी केंद्र सरकारने अडचणी दूर करण्याची मदत केली आहे. पीएम किसान समान योजनेच्या माध्यमातून १ लाख कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले असून, त्यात कुणीही मध्यस्थी नाही. तसेच मेगा फ्रुड पार्क, कोल्ड स्टोरेज अशा योजनांवर मोदी सरकारचे काम असल्याचं’ त्यांनी म्हटलं.

जलयुक्त शिवार योजनेचे कौतुक करत मोदी यांनी सांगितलं की, ‘पिण्याचे पाणी, शेतीसाठी पाण्याच्या वापराची मोठी समस्या आहे. पाणीटंचाईची मोठी समस्या महाराष्ट्रात आहे. फडणवीस यांच्या काळात जलयुक्त शिवार योजनेतून मोठे काम करण्यात आले’ असे सांगत त्यांनी फडणवीस यांचे कौतूक केलं.