पुतीन यांच्या विरोधी पक्षनेत्याला चहातून विषपाजलं, विमानाचं आपात्कालिन लॅन्डिग, प्रकृती चिंताजनक

मॉस्को : वृत्तसंस्था – रशियाचे विरोधी पक्षनेते एलेक्सी नवलनी यांना विमान प्रवासादरम्यान चहामध्ये विष मिसळून देण्यात आले. राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांचे कट्टर प्रतिस्पर्धी नवलनी कोमामध्ये असून त्यांना व्हेंटिलेडरवर ठेवण्यात आले आहे. नवलनीच्या प्रवक्त्या किरा यारम्यश यांनी ही माहिती दिली आहे. नवलनी एका कामासाठी सायबेरियाला गेले होते आणि तेथून मॉस्कोला परतत होते. मीडिया रिपोर्टनुसार, नवलनी यांची अचानक तब्येत बिघडल्यामुळे प्लाईटमधून आपात्कालिन लँडिंग करावी लागली.


रशियाच्या अधिकृत वृत्तसंस्थांनी नवलनींची प्रकृती गंभीर आहे असं म्हटलं आहे. किरा यांनी ट्विटरवर लिहले आहे की, नवलनीला अत्यंत प्राणघातक विष देण्यात आले आहे. आता ते आयसीयूमध्ये दाखल आहेत, नवलनी यांना चहामध्ये विष देऊन पाजण्यात आले. ते सकाळी फक्त चहा पितात असं किरा यांनी म्हटले आहे.


किरा यांनी डॉक्टरांच्या हवाल्याने सांगितले की, गरम पाण्यामुळे विष सहज चहाच्या आत विरघळले. विमानाच्या आत नवलनी उलट्या करु लागले. त्यानंतर ते बाथरुमध्ये जाऊन बेशुद्ध पडले. सध्या ते बेशुद्ध असून त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. पोलीस लवकरच घटनेचा तपास करतील.