Dangerous Android Apps | सावधान! चुकूनही Download करू नका ही धोकादायक Apps, होऊ शकता कंगाल; स्मार्टफोनमध्ये असेल तर ताबडतोब करा Delete

नवी दिल्ली : Dangerous Android Apps | सध्याच्या काळात जवळजवळ प्रत्येकजण स्मार्टफोन वापरतो आणि प्रत्येक स्मार्टफोन यूजर त्याच्या सोयीनुसार आणि गरजेनुसार त्याच्या डिव्हाईसमध्ये विविध स्मार्टफोन अ‍ॅप्स डाउनलोड करतो. थर्ड पार्टी अ‍ॅप्स डाऊनलोड करू नयेत आणि अ‍ॅप्स नेहमी गुगल प्ले स्टोअरवरून घ्यावेत, असे सांगितले जात असताना, गुगल प्ले स्टोअर (Google Play Store) वर सुद्धा असे अनेक अ‍ॅप्स आहेत, जे धोकादायक आहेत आणि ते कधीही डाउनलोड करू नका (Dangerous Android Apps). नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार, खाली दिलेल्या 35 अ‍ॅप्सची नावे अशी आहेत ज्यापासून तुम्हाला दूर राहावे लागेल आणि तुम्ही ती चुकूनही फोनमध्ये डाउनलोड करू नका (Dangerous Android Apps to Delete Immediately).

 

Android स्मार्टफोन वापरणार्‍यांनो सावधान

अलीकडेच, सायबर सिक्युरिटी टेक्नॉलॉजी कंपनी बिटडिफेंडर (Bitdefender) ने रिपोर्ट दिला आहे की अँड्रॉइड स्मार्टफोन यूजर वापरत असलेल्या 35 लोकप्रिय अँड्रॉइड अ‍ॅप्समध्ये धोकादायक मालवेअर आढळले आहेत, ज्यामुळे यूजर्ससाठी अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. हे अ‍ॅप्स फोनमध्ये ठेवू नयेत. फोनमध्ये यापैकी कोणतेही अ‍ॅप असल्यास ते लगेच डिलीट करा. (Dangerous Android Apps)

 

Apps बनवू शकतात कंगाल

सायबर सिक्युरिटी फर्मने सांगितले आहे की गुगल प्ले स्टोअर (Google Play Store) वर अनेक स्मार्टफोन अ‍ॅप्स उपलब्ध आहेत जे धोकादायक आहेत आणि ते डाउनलोड करू नयेत. हे अ‍ॅप्स फोनमध्ये डाऊनलोड झाल्यानंतर त्यांचे नाव बदलतात आणि नंतर ते डिव्हाईसमध्ये लपून राहतात. अशा प्रकारे, फोनमध्ये लपून हे अ‍ॅप्स यूजर्सचे तपशील हॅकर्सना पाठवत राहतात आणि तुमचे बँक खाते देखील अ‍ॅक्सेस करू शकतात.

 

ही आहे धोकादायक 35 अ‍ॅप्सची यादी

या यादीत कोणते अ‍ॅप समाविष्ट आहेत असा प्रश्न तुम्हाला पडला असेल, तर त्या अ‍ॅप्सबद्दल जाणून घ्या. या धोकादायक अ‍ॅप्समध्ये Walls light – Wallpapers Pack, Big Emoji – Keyboard, Grad, Wallpapers – 3D Backdrops, Engine Wallpapers – Live & 3D, Stock Wallpapers – 4K & HD, EffectMania – Photo Editor, Art Filter – Deep Photoeffect, Fast Emoji Keyboard, Create Sticker for Whatsapp, Math Solver – Camera Helper, Photopix Effects – Art Filter, Led Theme – Colorful Keyboard, Keyboard – Fun Emoji, Sticker, Smart Wifi, My GPS Location, Image Warp Camera, Art Girls, Wallpaper HD, Cat Simulator, Smart QR Creator, Colorize Old Photo, GPS Location Finder, Girls Art Wallpaper, Smart QR Scanner, GPS Location Maps, Volume Control, Secret Horoscope, Smart GPS Location, Animated Sticker Master, Personality Charging Show, Sleep Sounds, QR Creator, Media Volume Slider, Secret Astrology, Colorize Photos आणि Phi 4K Wallpaper – Anime HD या नावांचा समावेश आहे.

 

Web Title :- Dangerous Android Apps | beware of these dangerous
malware affected android smartphone apps may steal all your money

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा