उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी जीवनशैलीत करा थोडे बदल

पोलीसनामा ऑनलाइन टीम  – सध्याच्या धकाधकीच्या जीवनात अगदी लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत कोणालाही उच्च रक्तदाबाच्या समस्येने ग्रासले आहे. बदलत्या जीवनशैलीमुळे टेन्शन, थकवा, स्ट्रेस यामुळे अनेकांना उच्च रक्तदाब या आजाराने विळखा घातला आहे. परंतु हा या आजार जरी तुम्हाला सामान्य वाटत असला तरी त्याच्याकडे तुम्ही अजिबात दुर्लक्ष करू नका. कारण या आजाराने हृदयासंबधी अनेक आजार होतात. आणि ते तुमच्या मुत्यूचे कारण होऊ शकते. या आजार जर नियंत्रणात ठेवायचा असेल तर तुम्हाला तुमच्या जीवनशैलीत काही बदल करावे लागतील. उच्च रक्तदाब नियंत्रणात राहण्यासाठी तुम्ही तुमच्या जीवनशैलीत खालील बदल करू शकता.

१) पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही पहिल्यांदा तुमच वजन नियंत्रणात आणा. कारण वजन जर जास्त असेल तर रक्तदाब वाढतो. आणि जास्त वजनामुळे तुम्ही रात्री झोपेत श्वास घेण्यास बाधा आणू शकता. त्यामुळे रक्तदाब वाढू शकतो. याचबरोबर आपल्या कमरेभोवतालचे वजन वाढू नये याचीही काळजी घेतली पाहिजे.

२) उच्च रक्तदाब कमी करण्यासाठी दुसरा सर्वात महत्वाचा उपाय म्हणजे आपण दररोज व्यायाम करणे गरजेचे आहे. कारण रोज सायकलिंग, एरोबिक, नृत्य करणे, जॉगिंग आदी व्यायाम केल्याने तुमचा रक्तदाब नियंत्रांत येऊ शकतो.

३) बदलत्या जीवनशैलीमुळे आपल्या आहारात खूप बदल झाला आहे. आपल्याला घरातील आहारापेक्षा आपल्याला बाहेरील पदार्थ खाणे जास्त आवडते. पण उच्च रक्तदाब जर नियंत्रणात आणायचा असेल. तर तुम्हाला चांगला आहार घ्यावा लागेल. आहारात फळ, पालेभाज्या यांचा उपयोग करावा लागेल.

४) आहारातील मीठ एकदम कमी करा. कारण रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी शरीरात सोडियमचे प्रमाण अतिशय कमी लागते. त्यामुळे बाहेरून काही खरेदी करत असाल तर त्या पदार्थावरील लेबल पहा. आणि ज्या पदार्थात सोडियमची कमतरता आहे. तेच पदार्थ खरेदी करा.

५) तुम्हाला उच्च रक्तदाब जर नियंत्रणात आणायचा असेल तर तुम्हाला तुमचा तणाव कमी करावा लागेल. तुम्ही जर कोणत्या गोष्टीचा तणाव घेतला. तर तुमचा रक्तदाब वाढू शकतो. त्यामुळे आपल्या रोजच्या जीवनशैलीमध्ये जर वरील बदल केले. तर तुमचा रक्तदाब नियंत्रनात राहू शकतो.

फेसबुक पेज लाईक करा