पुणे-नगर महामार्गालगत धोकादायक रित्या गॅसपाइपलाइनचे काम सुरु

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे – नगर महामार्गाच्या रस्ता रुंदीकरणाचे काम सध्या जोरदार सुरू असून.या रस्ता रुंदीकरणाबरोबरच आता रस्त्यालगत एका खासगी गॅस पाईपलाईनचे पाइप टाकण्याचे देखील काम सुरू आहे. या गॅस पाईप लाईनचे काम सुरू असताना धोकादायकरित्या रस्त्याच्याकडेला पाईप टाकून क्रेनच्या साह्याने पाईप उचलून ते पाईप एकमेकांना जोडण्याचे काम केले जात आहे. पुणे नगर रोड हा अतिशय वाहतुकीचा रोड असून या चालू कामाच्या ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीने कुठल्याही प्रकारची खबरदारी गॅस कंपनी व कॉन्ट्रॅक्टर यांच्याकडून घेतलेली दिसत नाही.

एकीकडे रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम सुरु असतानाच आता गॅस पाइपलाइच्या कामामुळे वाहतूक कोंडीत देखील वाढ झाली आहे यामुळे सर्वसामान्य वाहनचालकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

तर दोनच दिवसापूर्वी राजस्थान मधील पाली जिल्ह्यात अशाच प्रकारे गॅस पाईपलाईनचे काम सुरू असताना. क्रेनच्या साह्याने उचलेला पाईप अचानकपणे बस मध्ये घुसल्याने मोठा अपघात झाला. आणि या अपघातात दोन जणांना आपला जीव देखील गमवावा लागला तर १२ जण गभीर जखमी झाले.

पुणे-नगर महामार्ग देखील वाघोली, सणसवाडी, शिक्रापूर मध्ये सुरू असलेल्या कामाच्या ठिकाणी देखील खबरदारी घेतली जात नाही त्यामुळे संबंधित विभाग अपघात होण्याची वाट पाहत आहे काय असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.

पुणे – नगर महामार्ग हा सतत रहदारीचा मार्ग असून संबंधित गॅस पाइपलाइकडून टाकताना खबरदारी घेतली जात नसेल तर त्यांच्यावर निश्चित कारवाई केली जाईल आणि राजस्थान मध्ये जो अपघात झाला त्यानंतर संबंधिताना याबाबत सूचना देखील करण्यात आलेले आहेत
मिलींद बारभाई (अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग)

 

गॅस पाइपलाइचे जे काही काम चालु आहे यामध्ये अनेक नियम पायदळी तुडवले जाता आहे,यामध्ये मोठा आपघात होउ शकतो, त्यामुळे अशा नियमबाह्य काम करणाऱ्या ठेकेदार व कंपनीवर गुन्हे दाखल करणार आहे.
संदिप सातव भाजपा युवा मोर्चा सरचिटणीस पुणे