काय खरंच रशियामध्ये झालं होतं खतरनाम ‘स्लीम एक्सपेरिमेंट’ ? कैदी खात होते स्वतःचं मास !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   जगभरात बरेच प्रयोग केले जातात, त्यातील काही गोष्टींबद्दलच लोकांना माहित असते तर काही गुप्त पद्धतीने केले जातात. असे म्हटले जाते की, एक असे एक्सपेरिमेंट जे 1940 च्या दशकात केले गेले होते. जे ऐकून लोकांच्या आजही अंगावर काटा येईल. या एक्सपेरिमेंटला ‘रशियन स्लीप एक्सपेरिमेंट’ म्हणून ओळखले जाते. या एक्सपेरिमेंटसाठी तुरूंगात असलेल्या पाच कैद्यांशी करार केला होता आणि त्यांना सांगितले गेले होते की, जर ते यात सहभागी झाले तर एक्सपेरिमेंट संपल्यानंतर लवकरच त्यांची सुटका केली जाईल. यासाठी त्यांना 30 दिवस झोप घ्यायची नाही असे सांगण्यात आले, कैदींनी होकार दिला. यानंतर त्यांना एअर टाइट चेंबरमध्ये बंदिस्त केले आणि त्यात एक गॅस टाकला गेला, जेणेकरून कैद्यांना झोप येऊ नये आणि शास्त्रज्ञ पाहू शकतील की, त्याचा त्यांच्यावर काय परिणाम होतो.

सुरुवातीला सर्व काही ठीक होते. सर्व कैदी एकमेकांशी आरामात बोलत होते. शास्त्रज्ञ त्यांची चर्चा देखील रेकॉर्ड करत असत आणि एका काचेच्या माध्यमातून त्यांच्यावर लक्ष ठेवत असत. सुमारे आठवडाभर सर्व कैद्यांची प्रकृती ठीक होती, परंतु त्यानंतर त्यांची प्रकृती खालावू लागली. कैद्यांनी हळू हळू एकमेकांशी बोलणे बंद केले. ते एकटेच बसून स्वत:शी बोलत असे. असे 10 दिवस गेले. मग अकरावा दिवस जवळ येताच अचानक एक कैदी जोरात ओरडायला लागला. तो इतका जोरात ओरडत होता की असे म्हणतात की, त्याचे व्होकल कार्ड फाटले होते. त्यातील सर्वात धक्कादायक बाब ही होती की, त्याच्या ओरडण्याचा बाकीच्या कैद्यांवर काहीच परिणाम झाला नाही.

कैद्यांची अवस्था पाहून वैज्ञानिकांनी हे एक्सपेरिमेंट थांबवण्याचा निर्णय घेतला. त्यांनी 15 तारखेला कैद्यांच्या कक्षात गॅस ओतला नाही, ज्याच्या मदतीने कैद्यांना झोपेपासून रोखले जात होते. पण त्याचा उलटा परिणाम झाला. सर्व कैदी अचानक ओरडले आणि म्हणाले की, आम्हाला बाहेर काढू नका, आम्हाला बाहेर यायचे नाही. दरम्यान, चेंबरमध्येच एका कैद्याचा मृत्यू झाला.

एक्सपेरिमेंट करत असलेल्या वैज्ञानिकांनी जेव्हा कैद्यांची अवस्था पाहिली तेव्हा त्यांना धक्का बसला. त्यांनी पाहिले की, अनेक कैद्यांच्या शरीराचे मांस गायब झाले होते, फक्त त्यांची हाडे दिसत होती. त्यांना पाहून असे वाटले की, जणू ते एकमेकांचे किंवा स्वतःचे मांस खात आहेत.

कैद्यांची अशी हालचाल आणि स्थिती पाहून वैज्ञानिकांनी वाटले की, त्यांना मारुन टाकले पाहिजे. यासाठी त्यांनी संघाच्या कमांडरशी चर्चा केली, परंतु कमांडरने तसे करण्यास नकार दिला आणि एक्सपेरिमेंट चालू ठेवला पाहिजे असे म्हणाले. तथापि, नंतर एका वैज्ञानिकांनी कैद्यांना ठार मारले आणि एक्सपेरिमेंट संबंधित सर्व पुरावे नष्ट करुन टाकले. आता ही कहाणी खरी आहे की खोटी आहे, हे माहित नाही, परंतु 2010 साली विकी डॉट कॉमच्या क्रीपाइपास्टा डॉट कॉम या वेबसाइटवर ही कथा पोस्ट केली गेली होती आणि ती सोशल मीडियावर खूप व्हायरल झाली होती. काही लोकांची ही कथा खरी आहे असा विश्वास आहे, कारण पहिल्या आणि दुसर्‍या महायुद्धाच्या काळात जपान आणि चीनसारख्या देशांमध्ये मानवांवर बरेच धोकादायक एक्सपेरिमेंट झाले आहेत.