ICC World Cup 2019 : सामन्याआधीच न्युझीलंडचा ‘हा’ दिग्गज खेळाडू बुमराला घाबरला, इतरांना त्याच्यापासून ‘सावध’ राहण्याचा सल्‍ला

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – न्यूझीलंडचा माजी कर्णधार आणि फिरकीपटू डॅनियल व्हिटोरी याने भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमरा याच्याबद्दल एक मोठे विधान केले आहे. उद्या भारत आणि न्यूझीलंड यांच्यात होणाऱ्या सेमीफायनलच्या पार्श्वभूमीवर केलेल्या या वक्तव्याला चांगलेच महत्व प्राप्त झाले आहे. त्याने बुमराविषयी बोलताना म्हटले कि, बुमराची गोलंदाजी खेळणे आता जवळपास अशक्य झाले आहे. या स्पर्धेत बुमराने आतापर्यंत सर्वाधिक कमी इकोनॉमी रेटने भारतासाठी १७ विकेट घेतल्या असून ४. ४८ इतकी कमी त्याचा इकोनॉमी रेट आहे. या स्पर्धेत आतापर्यंत झालेल्या ८ सामन्यात त्याने आपली छाप सोडली आहे. सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गालंदाजांच्या यादीत जसप्रीत बुमरा आणि न्यूझीलंडचा लॉकी फर्ग्यूसन संयुक्तपणे तिसऱ्या क्रमांकावर असून ऑस्ट्रेलियाचा मिचेल स्टार्क २६ विकेटसह पहिल्या क्रमांकावर असून बांगलादेशचा मुस्ताफिजुर रहमान हा २० विकेटसह दुसऱ्या क्रमांकावर आहे.

उद्या होणार पहिली सेमीफायनल
९ जुलै म्हणजेच उद्या भारत आणि न्यूझीलंड यांच्या पहिला सेमीफायनाचा सामना होणार असून या सामन्यात जसप्रीत बुमरा हाच न्यूझीलंडसाठी धोका असल्याचे डॅनियल व्हिटोरी याने म्हटले आहे.

आक्रमकपणे खेळायला हवे
या सामन्याविषयी अधिक बोलताना तो म्हणाला कि, बुमराची गोलंदाजी खेळणे आता जवळपास अशक्य झाले आहे. त्यामुळे न्यूझीलंडला जर या सामन्यात विजय मिळवायचा असेल तर आक्रमक क्रिकेट खेळण्याची गरज आहे. बुमराला थोडे देखील वरचढ होण्याची संधी देता कामा नये.

दरम्यान, याआधी आपल्या यशस्वी कारकिर्दीच्या रहस्याविषयी बोलताना बुमरा याने म्हटले होते कि, मी टीका आणि कौतुक या दोन्ही गोष्टी गांभीर्याने घेत नाही. मी फक्त माझ्या कामगिरीवर लक्ष देतो. योजना कशाप्रकारे अंमलात आणायच्या यावर माझे जास्त लक्ष असते आणि संघासाठी मी काय करू शकतो यासाठी मी नेहमी प्रयत्न करत असतो.

नियमित तोंडाची स्वच्छता ठेवल्यास अनेक आजार राहतील दूर

 ‘फिट अँड फाइन’ राहण्यासाठी नियमित करा हे उपाय

 ‘ही’ पेये प्यायल्यास वजन होईल कमी, शरीराला मिळेल ऊर्जा

 तंदुरुस्त राहण्यासाठी वेळापत्रकात करा थोडासा बदल

‘वजन’ कमी करताना घाई करू नका, हळूहळू करा कमी

 ‘हे’ नैसर्गिक उपाय केल्यास घेता येईल गाढ झोप