काय सांगता ! होय, ‘या’ बँकेत जमा रक्‍कमेवर मिळतो ‘मायनस’ व्याज दर, गुंतवणूक केल्यास रक्‍कम होते कमी, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लोक बँकेत पैसे जमा करतात कारण पडून राहण्यापेक्षा त्यावर काही तरी व्याज मिळेल. ज्या बँकेत जास्त व्याज मिळते, लोक त्या बँकेत पैसे ठेवण्याला पसंती देतात. तुम्हाला कधीही असं वाटणारच नाही की आपण ठेवलेल्या रक्कमेवर चांगला परतावा मिळू नये, चांगले व्याज मिळू नये. कारण अशी बँक आहे जी ग्राहकांना त्यांच्या रक्कमेवर निगेटिव्ह दराने व्याज देते. अर्थात तुम्ही बँकेत रक्कम ठेवल्यास ती रक्कम वाढत नाही तर कमी होते.

ग्राहकांना ही ऑफर डेन्मार्कची दानिश बँक स्पार नोर्ड्स देते. ही बँक कॉर्पोरेट आणि खासगी ग्राहकांना जमा रक्कमेवर – 0.75 टक्के व्याज देते. याआधी peers Sydbank आणि Jyske बँक देखील ग्राहकांना अशा प्रकारची आनोखी ऑफर देत होत्या.

बँकेचे सीईओ लार्स मोलर यांनी सांगितले की आम्ही मानतो की हे नैसर्गिक आणि मुद्रा नीतिच्या दृष्टीने योग्य आहे. मागील महिन्यात डेन्मार्कच्या केंद्रीय बँकेने जमा रक्कमेची रेकॉर्ड – 0.75 टक्के कमी केले. याच दिवशी यूरोपियन केंद्रीय बँकने व्याज दरात कपात केली होती आणि बॉन्ड खरेदीत देखील पुन्हा सुरु केली होती.

दानिश बँक स्पार नोर्ड्सचे नवे दर 1 जानेवारी 2020 पासून 110,000 पेक्षा अधिक डॉलर ठेवणाऱ्यासाठी लागू होतील. सध्या वैयक्तिक खात्यासाठी व्याज 0 तर कॉर्पोरेट खात्यावर – 0.5 टक्के व्याज आहे. ही बँक डेन्मार्कमधील 6 वी सर्वात मोठी बँक आहे.

Visit : Policenama.com