धक्कादायक ! 11 वी च्या विद्यार्थीनीनं होस्टेलवरच दिला मुलाला जन्म, एकजण निलंबीत

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – छत्तीसगढमधील दांतेवाडा येथून एक खळबजनक घटना समोर आली असून येथे अकरावीत शिकणाऱ्या एक मुलीने हॉस्टेलमध्येच मुलाला जन्म दिला आहे. या प्रकरणाची माहिती मिळताच शाळेसह प्रशासनाची एकच धांदल उडाली. मात्र, उपजिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार मुलीने जन्म दिलेलं अर्भक मृतावस्थेत आहे. विद्यार्थीनीवर सध्या रुग्णालयात उपचार सुरु असून या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अकरावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीने हॉस्टेलमध्ये मुलाला जन्म दिल्याचं समजताच तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. या प्रकरणी मेडिकल स्टाफशी चर्चा केली आहे. त्यानंतर तातडीने कारवाई करत हॉस्टेल सुपरीटेडंटला निलंबित करण्यात आलं असून चौकशीनंतर पुढची कारवाई केली जाणार आहे. दरम्यान, शाळा प्रशासनाने मृत अर्भक विद्यार्थीनीच्या कुटुंबियांकडे सोपवलं आहे.

दरम्यान, उपजिल्हाधिकाऱ्यांनी संगितले कि, विद्यार्थीनीने सांगितल्याप्रमाणे गेल्या दोन वर्षांपासून गावातील मुलाशी तिचे संबंध होते. दोन दिवसांपुर्वी ताप आल्याने तिला औषध देण्यात आलं होतं. त्यांनतर जेव्हा रात्री उशिरा तिची तब्येत बिघडली तेव्हा तिला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/