‘या’ करणावरुन माओवाद्यांनी चक्क ३ वर्षे घरातच कोंडले

दंतेवाडा : वृत्तसंस्था – छत्तीसगड मधील दंतेवाडा म्हणजे माओवाद्यांचे तळ मानले जाते. येथे राहणाऱ्या अनेक कुटूंबांना पोलिसांचे गुप्तहेर असल्याच्या संशयावरून गाव सोडण्यासाठी प्रवृत्त केले जात असल्याची माहिती मिळते आहे. या भागात माओवाद्यांविरोधात पोलिसांनी मोहीम हाती घेतली आहे. संवेदनशील क्षेत्रांत पोलिसांनी कॅम्पस लावले आहेत.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, दंतेवाडा येथील अनेक ग्रामस्थांनी पोलिसांकडे तक्रारी नोदवल्या आहेत. येथील ग्रामस्थांना माओवादी पोलिसांचे खबरे असल्याच्या करणावरून गाव सोडून जाण्यास भाग पाडत आहेत. हे प्रकरण इथपर्यंतच थांबले नसून तेथील गावातील  एका व्यक्तीला माओवाद्यांनी पोलिसांचे खबरी असल्याच्या संशयावरून ३ वर्षे घरात कोंडून ठेवल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्याने स्वतःची सुटका करून घेतल्यानंतर तो अनेक महिने रुग्णालयात होता. माओवाद्यांना तो सुटल्याची माहिती मिळाली, तेव्हा त्यांनी या व्यक्तीच्या वडील आणि भावाला त्याच्याबद्दल विचारणा करण्यासाठी बळजबरीने पकडून नेले. या प्रकरणाची पोलीस चौकशी सुरू आहे.
‘मागील ६ ते ८ महिन्यांपासून आम्ही या भागात कारवाई करत आहोत. यामुळे येथील माओवाद्यांचे अनेक तळ उद्ध्वस्त झाले आहेत. तसेच, त्यांचे येथील अस्तित्व धोक्यात आले आहे. यामुळे चवताळलेले माओवादी ग्रामस्थांना त्रास देत आहेत. आम्ही त्यांच्या विरोधात दोन गुन्हे दाखल केले आहेत. पीडितांना राज्याच्या योजनांनुसार मदत केली जात आहे. माओवाद्यांना धडा शिकवण्यासाठी पोलीस कॅम्पही लावले जात आहेत,’ असे दंतेवाडाचे पोलीस अधीक्षक अभिषेक पल्लव यांनी सांगितले.
पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like