Danushka Gunathilaka | वर्ल्ड कप खेळलेल्या श्रीलंकेच्या ‘या’ खेळाडूला बलात्काराच्या आरोपाखाली सिडनीत अटक

सिडनी: वृत्तसंस्था – क्रिकेट विश्वातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. श्रीलंकन क्रिकेटपटू दानुष्का गुणथिलकाला (Danushka Gunathilaka) ऑस्ट्रेलियात अटक करण्यात आली आहे. श्रीलंकन टीमसह तो ऑस्ट्रेलियात (Austrelia) टी 20 वर्ल्ड कप (T-20 World Cup) खेळण्यासाठी गेला होता. एका महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपाखाली त्याला अटक करण्यात आली आहे. 31 वर्षीय दानुष्का गुणथिलकाला (Danushka Gunathilaka) अटक करुन रविवारी पहाटेच्या सुमारास सिडनी पोलीस ठाण्यात (Sydney Police Station) नेण्यात आले. त्याने 2 नोव्हेंबरला हे कृत्य केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?
गेल्या आठवड्यात सिडनीतल्या एका महिलेनं केलेल्या तक्रारीवरुन गुणतिलकाला (Danushka Gunathilaka)
अटक करण्यात आली आहे. 2 नोव्हेंबरला या महिलेनं त्याच्यावर शारीरिक शोषण (Physical abuse) केल्याचा
आरोप केला होता.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑनलाईन डेटिंग अ‍ॅपवर (Dating app) ते दोघं बराच काळ संपर्कात होते. धनुष्का गुणतिलकाला याच्या विरोधात तक्रार दाखल झाल्यानंतर त्याला एका हॉटेलमधून रात्री 1 वाजता अटक करण्यात आली.

श्रीलंका क्रिकेट बोर्डाचं स्पष्टीकरण
दरम्यान श्रीलंकन क्रिकेट बोर्डानं (Sri Lankan Cricket Board) गुणतिलकाच्या अटकेसंदर्भात स्पष्टीकरण दिलं
आहे. धनुष्का गुणतिलकाला एका महिलेच्या लैंगिक अत्याचाराच्या आरोपावरून अटक करण्यात आली असून उद्या
त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याचे श्रीलंका क्रिकेट बोर्डाकडून सांगण्यात आले आहे.

Web Title :-  Danushka Gunathilaka | t20 world cup update sri lankan batsman danushka gunathilaka charged for alleged sexual assault rape on women at 2 november arrested in sydney

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा 

Sharad Ponkshe | शरद पोंक्षेची टिकली प्रकरणावरील ‘ती’ पोस्ट चर्चेत; म्हणाले….

Andheri Bypoll Result | भाजपच्या मदतीने ऋतुजा लटके विजयी, अन्यथा…, ऋतुजा लटकेंच्या विजयानंतर भाजपची प्रतिक्रिया