Dapoli Sai Resort Scam | सलग 4 तास चौकशीनंतर सदानंद कदम यांना ईडीकडून अटक

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – दापोलीतल्या साई रिसॉर्ट प्रकरणी (Dapoli Sai Resort Scam) ईडीने (ED) शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि माजी मंत्री रामदास कदम (Ramdas Kadam) यांचे भाऊ सदानंद कदम (Sadanand Kadam) यांना शुक्रवारी सकाळी खेडमधील निवासस्थानातून ताब्यात घेतले होते. त्यानंतर त्यांना मुंबईच्या ईडी कार्यालयात (ED OfficeMumbai) आणण्यात आले. इथे त्यांची तब्बल चार तास चौकशी करण्यात आली. चौकशी नंतर सदानंद कदमांना अटक (Arrest) करण्यात आली. सध्या दापोलीतील साई रिसॉर्टची मालकी सदानंद कदम यांच्याकडे आहे.

सदानंद कदम राजकारणात सक्रीय नाहीत मात्र ठाकरे गटाचे नेते (Thackeray Group) अनिल परब (Anil Parab) हे व्यावसायिक भागीदार आहेत. अनिल परब आणि रामदास कदम यांच्यातून विस्तव जात नाही. सदानंद कदम यांनी अनिल परब यांच्याकडून साई रिसॉर्टची जमीन 2020 ला विकत घेतली होती. याच व्यवहारात अफरातफर झाल्याचा ईडीचा आरोप आहे. मागील काही दिवसांपासून भाजप नेते किरीट सोमय्या (BJP Leader Kirit Somaiya) यांनी साई रोसॉर्ट प्रकरणी अनिल परब यांच्यावर सतत आरोप केले होते.

याबाबत विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी सांगितले की, काही दिवसांपूर्वी खेडमध्ये उद्धव ठाकरे
(Uddhav Thackeray) यांची सभा झाली होती. ही सभा यशस्वी होण्यामागे सदानंद कदम यांचा मोठा वाटा होता.
त्यामुळेच सुडबुद्धीने ही कारवाई केल्याचा आरोप विनायक राऊत यांनी केला आहे.
तर काका सदानंद कदम यांच्यावर झालेली कारवाई कायदेशीरच असल्याचे आमदार योगेश कदम
(MLA Yogesh Kadam) यांनी सांगितले.

Web Title : Dapoli Sai Resort Scam | sadanand kadam arrest by ed dapoli sai resort scam

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

MLA Sada Sarvankar | शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकरांना ‘त्या’ प्रकरणात पोलिसांकडून ‘क्लिन चीट’

Urfi Javed | उर्फी जावेदने ‘या’ कारणामुळे खतरो के खिलाडी कार्यक्रमास दिला नकार