‘सायकल गर्ल’ ज्योती संदर्भात नवा वाद, फिल्म कंपनीनं तिच्या वडिलांवर ‘हा’ आरोप करत दिला कायदेशीर कारवाईचा इशारा !

पोलीसनामा ऑनलाईन टीम : लॉकडाऊनमध्ये हरियाणातील गुरुग्रामधील ज्योती हिनं आपल्या वडिलांना 1200 किलोमीटर प्रवास करत चक्क सायकलवरून घरी नेलं. काही दिवसांपूर्वीच अशी माहिती आली होती की, ज्योतीच्या आयुष्यावर लकवरच चित्रपट तयार केला जाणार आहे. समोर आलेल्या माहितीनुसार फिल्म निर्माता, सह दिग्दर्शक विनोद कापडी यांनी ज्योती आणि तिचे वडिल मोहन पासवान यांच्यासोबत फोनवरून संवाद साधला होता. भगीरथी बॅनरखाली हा सिनेमा तयार केला जाणार होता. या प्रकरणी आता नवीन माहिती समोर आली आहे. ज्योतीचे वडिल मोहन पासवान यांना मुंबईतील एक वेब सीरिज आणि डॉक्युमेंट्री फिल्म निर्मात्या कंपनीनं लीगल नोटीस पाठवली आहे. ज्योतीच्या वडिलांनी करार तोडण्यावर कंपनीनं आक्षेप घेतला आहे आणि कायदेशीर कारवाई करण्याची इशाराही दिला आहे.

मोहन पासवान यांचा दुसऱ्या कंपनीसोबत करार
27 मे 2020 रोजी दरभंगाच्या सिंहवाडा भागातील सिरहुल्लीची रहिवाशी सायकल गर्ल ज्योतीचे वडिल मोहन पासवान यांनी भगीरथी फिल्म कंपनीसोबत सिनेमा तयार करण्याचा करार केला होता. मिळालेल्या माहितीनुसार यासाठी 2 लाख 51 हजार रुपये देण्याच्या कंपनीच्या करारावर हस्ताक्षर करण्यात आले होते. याचा पहिला हप्ता 51 हजार रुपये खात्यात जमाही करण्यात आले होते. मोहन पासवान यांनी कंपनीला सिनेमा तयार करण्याचा अधिकार देत काही प्राथमिक कागदपत्रांवर सही केली होती. आता नवीन वाद समोर आला आहे. भगीरथी फिल्मनं प्रसिद्धीपत्रक प्रसिद्ध करत सांगितलं की, मोहन पासवान यांनी शाईन कृष्णासोबतही सिनेमाचा दुसरा करार केला आहे जो अयोग्य आणि बेकायदेशीर आहे.

भगीरथी फिल्मसनं पाठवली लीगल नोटीस
प्रसिद्धीपत्रकात भगीरथी फिल्म्सनं म्हटलं की, “विनोद कापडी स्वत: येऊन ज्योतीला भेटणार होते. परंतु लॉकडाऊनमुळं ते काही शक्य झालं नाही. नंतर ज्योतीच्या वडिलांनी असं सांगितलं की, ते लग्नात व्यस्त आहेत. नंतर त्यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला गेला तर सांगण्यात आलं की, ते लखनऊला गेले आहेत, नंतर ते दिल्ली ट्रायलला गेले आहेत असं सांगितलं गेलं. यामुळं विनोद कापडी त्यांना भेटू शकले नाही. आता असं समजत आहे की, त्यांनी दुसऱ्या कंपनीसोबत करार केला आहे जो बेकायदेशीर आहे. यासंदर्भात आता भगीरथी फिल्म्सनं पासवान यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे.

करार तोडल्यास होणार कायदेशीर कारवाई
भगीरथी फिल्म्सनं सांगितलंय की, त्यांची इच्छा नाही की, कोणताही वाद व्हावा. यामुळं शाईन कृष्णा सोबत करार करणं गैर आहे. म्हणून दुसरा करार रद्द केला जावा. अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशाराही कंपनीनं दिला आहे.

ज्योतीच्या कुटुंबीयांनी मीडियापासून ठेवलं अंतर
या काळात मीडियानं जेव्हा ज्योती आणि तिच्या वडिलांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला तेव्हा ते समोर येत नाहीत असं दिसतंय.

‘कोर्टातच बाजू मांडू’ : मोहन पासवान
खास बात अशी की, सूत्रांनी माहिती दिलीय की, ज्योतीच्या वडिलांचं म्हणणं आहे की, करार त्यांनी तोडला नाही तर कंपनीनंच उशीर केला आहे. असंही समजत आहे की, ते कोर्टाच्या कारवाईला सामोरे जाण्यास तयार असून त्यांची बाजू ते कोर्टातच मांडतील असं त्यांनी सांगितलंय.