ममता बॅनर्जींचं मोदी सरकारला ‘ओपन’ चॅलेंज, म्हणाल्या…

कोलकत्ता : वृत्तसंस्था – सुधारित नागरिकत्व कायद्यावरून तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मोदी सरकारला थेट आव्हान दिलं आहे. कोलकत्यात एक रॅली काढून बॅनर्जी यांनी सुधारित नागरिकत्व कायद्यावरून सरकारला लक्ष केले आहे. राज्यात नवा कायदा लागू करणार नाही. केंद्रान माझं सरकार बरखास्त करण्याची हिंमत करून दाखवावी, असे खुले आव्हानच ममता बॅनर्जी यांनी दिले आहे.

https://twitter.com/jdhankhar1/status/1206385868606341120

तुम्हाला माझं सरकार बरखास्त करायचं असेल, तर खुशाल बरखास्त करा. पण मी बंगालमध्ये राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी आणि सुधारित नागिरकत्व कायद्याची अंमलबजावणी होऊ देणार नाही, असा आक्रमक पवित्रा ममता बॅनर्जी यांनी घेतला आहे. त्यांना वाटतं ममता बॅनर्जी एकट्या आहेत. मात्र, आता माझ्यासोबत कित्येक जण आहेत. तुमचा हेतू चांगला असेल, तर जनता तुमच्या सोबत असते, असं त्या बोलताना म्हणाल्या.

ही धर्मासाठीची लढाई नाही, तर हक्कांसाठी चाललेला संघर्ष असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. दरम्यान, ममता बॅनर्जी यांनी काढलेल्या मोर्चाबद्दल राज्यपाल जगदीप धनखर यांनी नाराजी व्यक्ती केली. ममता यांचा हा मोर्चा घटनाबाह्य असल्याची टीका धनखर यांनी केली. मुख्यमंत्री आणि मंत्र्यांनी सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात काढलेल्या मोर्चामुळे मी दु:खी आहे. त्यांचे हे पाऊल घटनाविरोधी आहे. त्यामुळे परिस्थिती चिघळू शकते, असे ट्वीट राज्यपालांनी केलं आहे.

फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/