तुमच्यात ‘हिंमत’ असेल तर ‘सरकार’ पाडाच, शिवसेनेच्या ‘या’ दिग्गज मंत्र्यानं दिलं BJP ला थेट ‘आव्हान’

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन –  राज्यातील कोरोना बाधितांची संख्या वाढत असताना राजकिय नेत्यांच्या राजभवनावर जाऊन राज्यपालांची भेट घेतली जात आहे. त्यामुळे एकिकडे कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना दुसरीकडे कोरोनावरून राज्याचे राजकारण तापत असल्याचे पहायला मिळत आहेत. विरोधी पक्ष असलेल्या भाजपकडून राज्यातील सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या सरकारच्या मंत्र्यांनी पत्रकार परिषद घेऊन केला आहे. आता शिवसेनेचे नेते आणि पाणिपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी आक्रमक भूमिक घेत भाजपला थेट आव्हान दिलं आहे.

कोरोना संकट संपल्यावर मैदानात येऊ. तुमच्यात हिम्मत असेल तर सरकार पाडाच, असे थेट आव्हान पाटील यांनी विरोधकांना दिले आहे. भाजपने सरकार पाडून दाखववा. पण त्याआधी सरकार कोरोना संकटात हरतऱ्हेचे प्रयत्न करत असताना स्वत:किती पुढाकार घेतला, त्याचा विचार विरोधकांनी करावा, असे पाटील यांनी म्हटले आहे. विरोधकांकडून कोरोनाच्या काळातही राजकारण सुरु आहे. मध्य प्रदेशची पुनरावृत्ती करण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याचा दावा त्यांनी केला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेने स्विकारलं आहे. जनतेच्या मनात उद्धव ठाकरे, अजित पवार यांचे स्थान निर्माण झालं आहे. त्यामुळे विरोधकांकडून काही केविलपणे प्रयत्न सुरु आहेत. महाविकास आघाडी सरकारला सल्ले देणाऱ्या फडणवीसांनी तेच सल्ले गुजराच्या मुख्यमंत्र्यांना द्यावेत. फडणवीसांना अधिकाऱ्यांचा लवाजमा मागे पुढे घेऊन फिरण्याची सवय लागली होती. ती सवय सुटल्याने आता त्यांना करमत नाही. पाण्याविना मासा तडफडतो, तशी फडणवीस यांची सत्तेशिवाय तडफड सुरु आहे, असा खोचक टोला पाटील यांनी लगावला.