डोळ्यांखालील काळी वर्तुळं घालवायचीत ? जाणून घ्या ‘हे’ 6 सोपे घरगुती उपाय

पोलिसनामा ऑनलाईन – कायमच डोळे चोळणं, अ‍ॅलर्जी, झोप न येणं, अ‍ॅलर्जी, डोळ्यांखालची त्वचा निस्तेज होणं, वयोमान, डिहायड्रेशन, अनुवांशिकता आणि कधी कधी पिगमेंटेशनमुळं डोळ्यांखाली काळी वर्तुळं (Dark Circles ) येतात. अनेकजण यावर विविध उत्पादनं वापरून पाहतात. परंतु त्यानं काहीही फरक पडत नाही. जर तुम्हीही या समस्येनं ग्रस्त असाल तर आपण यासाठी काही घरगुती उपाय जाणून घेणार आहोत.

1) टोमॅटो – एक लहान लिंबांचा रस आणि एका लहान टोमॅटोची पेस्ट एकत्र करून ते मिश्रण डोळ्यांखाली लावा. 10 मिनिटे हे मिश्रण डोळ्यांखाली ठेवून त्यानंतर पाण्यानं धुवून घ्या. दिवसातून साधारण दोन वेळा हा प्रयोग केला तर फायदा होतो. त्याचसोबत टोमॅटो, लिंबाचा रस आणि पुदीना यांचा रस पिल्यानंही काळी वर्तुळं कमी होतात.

2) बटाटा – डोळ्यांखालील काळी वर्तुळं लवकर घालवायची असतील तर बटाट्याचा अतिशय चांगला उपयोग होतो. कच्च्या बटाट्याचा रस कापसाच्या बोळ्यानं डोळ्यांवर लावावा. कापूस त्या रसात भिजवून डोळ्यांवर ठेवावा. 10 मिनिटांसाठी हा कापूस असाच डोळ्यांवर ठेवा आणि नंतर डोळे धुवून टाका.

3) टी बॅग – डोळ्यांखालील वर्तुळं कमी करण्यासाठी थंड टी बॅग हा एक उत्तम उपाय आहे. टी बॅग पाण्यात भिजवून थोडा वेळा फ्रीजमध्ये गार करण्यासाठी ठेवा. नंतर त्या डोळ्यांवर ठेवाव्यात. या उपायानं तुम्हाला चेहऱ्यात बराच फरक झालेला दिसेल.

4) बदाम तेल – बदाम तेल हे केसांच्या आणि त्वचेच्या आरोग्यासाठी खूप उत्तम काम करतं. यात मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन ई असतं. त्वचा कोमल होण्यासाठी याचा उपयोग होतो. त्यामुळं झोपताना डोळ्यांखाली बदाम तेल लावून मालिश केली तर काळी वर्तुळं दूर होण्यास मदत होते.

5) संत्र्याचा रस – संत्र्याचा रस हा डोळ्यांखालील काळी वर्तुळं दूर होण्यासाठी आणखी एक उत्तम घरगुती उपाय आहे. हा रस डोळ्यांखाली लावल्यास अगदी कमी वेळात अतिशय चांगला झालेला उपयोग दिसतो. केवळ काळी वर्तुळं कमी करण्यासाठीच नाही तर डोळ्यांची चमक वाढवण्यासठीही याचा उपयोग होतो.

6) गुलाब पाणी – गुलाब पाण्यामुळं त्वचा चमकदार होते. त्वचेत जिवंतपणा येण्यासाठी या पाण्याचा उपयोग होतो. दिवसातून दोन वेळा 15 मिनिटांसाठी कापसावर गुलाबपाणी टाकून हा कापूस डोळ्यांवर ठेवल्यास त्याचा अतिशय चांगला उपयोग होतो.

टीप – वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल अ‍ॅडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये. काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अ‍ॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अ‍ॅलर्जी असणारे किंवा तुम्हाला सूट न होणारे पदार्थ वापरणं किंवा सेवन करणं टाळावं.