आता फेसबुक चॅटिंग होणार आणखी मजेदार ;  मेसेंजरसाठी  ‘हे’ नवीन फीचर लाँच 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – फेसबुक आपल्या मेसेंजर  ॲप मध्ये सातत्याने नवनवीन फीचर्स ॲड करत आहे. फेसबुक मेसेंजर ॲपमध्ये आता ‘डार्क मोड’  हे नवीन फीचर सुरू करण्यात आले आहे. डार्क मोड हे फिचर सध्या ट्विटर, यूट्यूब, गुगल मॅप्स आणि गुगल मेसेज , व्हॉट्सॲप या ॲप्समध्ये आहे. फेसबुकने हे खास फीचर सर्वांसाठी सुरू केले असून यासाठी कोणताही मेसेज पाठवण्याची आवश्यकता नाही.

असे  करा मेसेंजर ॲपमध्ये ‘डार्क मोड’ फीचर सुरू –

‘डार्क मोड’ सुरू करण्यासाठी मेसेंजर ॲपच्या सेटिंगमध्ये जाऊन उजव्या बाजूला असणाऱ्या पर्यायावर क्लिक करावे लागेल.  जर तुम्हाला ॲपमध्ये ‘डार्क मोड’चा पर्याय दिसत नसेल तर ॲप अपडेट करावे लागेल. डार्क मोडमुळे फेसबुकचे बॅकग्राउंड काळ्या रंगात दिसेल.

‘डार्क मोड’चे फायदे –
‘डार्क मोड’ हे डोळ्यांसाठीदेखील चांगले आहे. त्याशिवाय काळा डिस्प्ले असल्यामुळे मोबाइल बॅटरी कमी खर्च होते.
फेसबुककडून मार्च महिन्यात युजर्सना  ‘डार्क मोड’ची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. मात्र, काही तांत्रिक कारणास्तव ही सुविधा वापरण्यात काही  युजर्सना अडचण निर्माण होत होती.  मेसेंजर ॲपमध्ये ‘डार्क मोड’ सुरू करण्यासाठी याआधी आपल्या कॉन्टॅक्ट लिस्टमधील एकाला मून इमोजी पाठवावी लागत होती. नोटिफिकेशन आल्यानंतर ‘डार्क मोड’ अनलॉक होत असे. आता सर्वच युजर्ससाठी ‘डार्क मोड’ सुरू करण्यात आले आहे.