Darryl Mitchell | न्यूझीलंड संघाला मोठा धक्का! ‘हा’ अष्टपैलू खेळाडू T-20 वर्ल्डकपमधून OUT

पोलीसनामा ऑनलाईन – Darryl Mitchell | न्यूझीलंड क्रिकेट संघाच्या (New Zealand Cricket Team) गोटातून एक मोठी बातमी समोर आली आहे. T-20 वर्ल्डकप (T-20 World Cup) अगोदर काही खेळाडू संघाबाहेर गेल्याने भारत (India) आणि वेस्ट इंडिज (West Indies) संघाला मोठा धक्का बसला आहे. त्यानंतर आता न्यूझीलंडचा अष्टपैलू खेळाडू डॅरिल मिशेल (Daryl Mitchell) हा जखमी झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे तो T-20 वर्ल्डकप खेळू शकेल कि नाही यावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. त्याला ही दुखापत झाली तेव्हा तो नेटमध्ये फलंदाजी करत होता. एक्स-रे केल्यानंतर असे समजले की, त्याच्या हाताच्या करंगळीला दुखापत झाली आहे.

या दुखापतीतून सावरण्यासाठी त्याला अंदाजे दोन आठवड्यांचा काळ लागू शकतो.
त्याच्या दुखापतीवर आता लक्ष ठेवले जाईल. त्याला काही वेळ लागेल त्यानंतर तो आगामी T-20 विश्वचषकात उपलब्ध होणार की नाही याबाबत निर्णय घेतला जाईल अशी माहिती न्यूझीलंडचे मुख्य प्रशिक्षक गॅरी स्टेड (New Zealand Head Coach Gary Stead) यांनी दिली आहे. (Darryl Mitchell)

तसेच T-20  क्रिकेटमध्ये तो आमच्यासाठी खूप महत्त्वाचा खेळाडू आहे आणि या तिरंगी मालिकेत आम्हाला त्याची नक्कीच उणीव भासेल.
विश्वचषकातील न्यूझीलंडच्या पहिल्या सामन्याला फक्त दोन आठवडे शिल्लक आहेत आणि आम्हाला त्याच्या बदली खेळाडू निवडताना खूप कसरत करावी लागत आहे.
पण तोपर्यंत तो दुखापतीतून सावरेल असा मला विश्वासदेखील न्यूझीलंडचे मुख्य प्रशिक्षक गॅरी स्टेड यांनी व्यक्त केला आहे.

Web Title :- Darryl Mitchell | new zealand all rounder darryl mitchell has been ruled out of the three nation tri series due to injury

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा