Darwin Electric Scooter | डार्विनची नवीन इलेक्ट्रिक टू-व्हीलर ! अवघ्या 68,000 रुपयात खरेदी करता येणार; शानदार फिचर्सही मिळणार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Darwin Electric Scooter | डार्विन (Darwin) या इलेक्ट्रिक टू-व्हीलर (Electric two-wheeler) प्रोड्युसर प्लॅटफॉर्म ग्रुप ऑफ कंपनीने आपल्या भारतात डी-5, डी-7 आणि डी-14 या 3 नवे इलेक्ट्रिक टू-व्हीलर लाँच (Darwin Electric Scooter) केल्या आहेत. या नव्या इलेक्ट्रिक टू-व्हीलर मध्ये अनेक फिचर आणले आहेत. जबरदस्त डिझायइन, उत्कृष्ठ सस्पेन्शन, रिजनरेटिव्ह ब्रेकिंग हे समाविष्ठ करण्यात आले आहेत. दरम्यान, या तिनही टू-व्हीलर एक्स-शोरूम दर 68,000 रुपये, 73,000 रुपये आणि 77,000 रुपये आहेत.

 

डार्विनच्या स्कूटर्स ओला इलेक्ट्रिक स्कूटर्सपेक्षा खूपच स्वस्त (Darwin Electric Scooter) आहेत आणि या मोठ्या प्रमाणात परवडणाऱ्या स्कूटर्स ग्राहकांसाठी बाजारात आल्या आहेत. तर, एका चार्जवर ही इलेक्ट्रिक स्कूटर 70 ते 120 किमीपर्यंत चालवता येणार आहे. अशी टू-व्हीलर (Electric two-wheeler) लाॅच केले आहे. दरम्यान, ओलाच्या इलेक्ट्रिक स्कूटर्सना बाजारात चांगलीच पसंती मिळत आहे, S1 आणि S1 Pro ला ग्राहकांकडून मोठी मागणी आहे. या दोन्हीच्या किंमती अनुक्रमे 1 लाख आणि 1.30 लाख रुपये आहेत. यात कंपनीने S1 Pro सोबत अधिक पॉवरफुल बॅटरी बसवली आहे आणि एका चार्जवर ती 181 किमी पर्यंत चालेल असं म्हटलं जातंय.

दरम्यान, सिम्पल वन आणि एथर एनर्जी देखील त्यांच्या इलेक्ट्रिक स्कूटरसह बाजारात आहेत आणि ओला ईव्हीशी स्पर्धा करत आहेत.
येथे सिम्पल वन इलेक्ट्रिक स्कूटरची एक्स-शोरूम किंमत 1.10 लाख रुपये आहे, तर एथर 450X ची एक्स-शोरूम किंमत 1.32 लाख रुपये ठेवण्यात आलीय. यानंतर, बजाज चेतकची ईव्ही 1.25 लाख ते 1.27 लाख रुपयांच्या एक्स-शोरूम किंमतीत उपलब्ध करून देण्यात येत आहे, तर TVS iCube ची किंमत 1 लाख रुपये निश्चित करण्यात आलीय.

 

या दरम्यान, बाउन्स इलेक्ट्रिक लवकरच आपली इलेक्ट्रिक स्कूटर इन्फिनिटी भारतात लाँच करणार आहे.
2 डिसेंबर रोजी ही स्कूटर लाँच करण्यात येणार असल्याची घोषणा कंपनीकडून करण्यात आली आहे.
ज्या दिवशी ही स्कूटर लाँच केली जाईल त्याच दिवसापासून याचं बुकींगही सुरू केली जाणार आहे.
लाँच नंतर कंपनी पुढील वर्षापासून या स्कूटरची डिलिव्हरी सुरू करणार आहे. (Darwin Electric Scooter)

 

Web Title :- Darwin Electric Scooter | darwin three electric scooters launched in the budget will give a range of up to 120 km on a single charge marathi news policenama

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Weight Loss Winters | हिवाळ्यात वजन कमी करण्यासाठी सेवन करा ‘या’ 5 गोष्टी, वाढणारे पोट राहिल नियंत्रणात

Genelia Dsouza | जेनेलियाच्या ‘परी’सारख्या मोहक रुपानं चाहत्यांचं जिंकलं मन, पाहून तुम्हीपण व्हाल थक्क

Parth Pawar | गाववाला व बाहेरचा वाद उभा करुन लोकांमध्ये फूट पाडण्याचे राजकारण थांबवा; पार्थ पवारांचा सत्ताधाऱ्यांना सल्ला